आरग ग्रामपंचायतीत एकूण १७ सदस्य आहेत. यंदा प्रथमच तिरंगी लढतीत कोणत्याही स्थानिक आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. त्यामुळे बहुमतासाठी अपक्ष उमेदवार हा सत्तास्थापनेसाठी महत्त्वाचा ठरला. यंदा निवडणुकीत युवा शेतकरी पॅनलचे ४ उमेदवार व विकास आघाडी पॅनलचे ४ उमेदवार विजयी झाले. बहुमतासाठी एकूण ९ सदस्य संख्या आवश्यक होती. अपक्ष उमेदवार विनोद सिद्राम बुरुड यांनी युवा विकास आघाडी पॅनलला पाठिंबा दिला. सरपंचपदासाठी तीन व उपसरपंचपदासाठी चार उमेदवारांनी अर्ज दाखल केला. सरपंचपदी सुरेखा नाईक व उपसरपंचपदी विनोद बुरुड यांची निवड झाली. सरपंचपद नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलेसाठी आरक्षित झाले होते. निवडणूक अधिकारी म्हणून ग्रामसेवक नागेश कोरे यांनी काम पाहिले. नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच यांचा सत्कार करण्यात आला.
आरगच्या सरपंचपदी सुरेखा नाईक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:26 IST