शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

आष्ट्यातील केळी सौद्यामुळे शेतकऱ्यांना आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:25 IST

आष्टा : इस्लामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीने आष्टा येथे सुरू केलेल्या उपबाजारात हळदीला भाव मिळत आहे. या ठिकाणी केळीचे ...

आष्टा : इस्लामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीने आष्टा येथे सुरू केलेल्या उपबाजारात हळदीला भाव मिळत आहे. या ठिकाणी केळीचे सौदे सुरू करीत केळी उत्पादकांना आधार देण्याचे काम बाजार समितीने केले आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांसाठी नवीन बाजारपेठ निर्माण केली आहे असे प्रतिपादन जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केले.

आष्टा येथे मंगळवारी जयंत पाटील यांच्या हस्ते केळीचे सौदे सुरू करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी नगराध्यक्ष झुंजारराव शिंदे, झुंजारराव पाटील, नगराध्यक्षा स्नेहा माळी, प्रतिभा पेटारे, वैभव शिंदे, संभाजी कचरे, श्रीकांत कबाडे, विराज शिंदे, माणिक शेळके, रमेश हाके, बाजार समितीचे सभापती अल्लाउद्दीन चौगुले, बाळासाहेब इंगळे, दत्तात्रय मस्के, ॲड. विश्वासराव पाटील व पदाधिकारी उपस्थित होते.

जयंत पाटील म्हणाले नवे कायदे आपल्या मर्यादा स्पष्ट करीत आहेत. शेतकऱ्यांसाठीची शाश्‍वत व्यवस्था अनेक वर्षे चालू आहे. ती पारदर्शी कारभारामुळे शेतकऱ्यांच्या विश्वासास पात्र ठरली आहे. शेतकऱ्यांच्या मालाची विक्री त्यांच्यासमोर होत आहे. हळद व केळीचे सौदे मार्केट कमिटीच्या वतीने होत असल्याने व ती जबाबदारी घेत असल्याने या देशात नव्याने निर्माण होणाऱ्या व्यवस्थेवर लोकांचा अद्याप विश्वास नाही. पारंपरिक बाजार समितीने पारदर्शी कारभार करून लोकांचा विश्वास कायम राखावा.

यावेळी शिवाजी चोरमुले, धैर्यशील शिंदे, सतीश माळी, बाजीराव पाटील, संभाजी माळी, रामचंद्र सिद्ध, विजय मोरे, विजय जाधव, मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण, अर्जुन माने, प्रभाकर जाधव, व्ही. डी. पाटील, निवास गावडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. अल्लाउद्दीन चौगुले यांनी स्वागत केले. विजय जाधव यांनी आभार मानले.

चौकट:

देशी केळीला २१ हजार दर

भूपाल झिनगे यांच्या देशी केळीला २१ हजार रुपये, तर पांडुरंग काळे व अमित कदम यांच्या संकरित जी नाईन केळीला १२ हजार ९०० रुपये, सागर पाटील यांच्या केळीला ९ हजार रुपये प्रति टन दर मिळाला. एकूण देशी केळी २ टन, तर जी नाईन केळी २५ टन आवक झाली. प्रत्येक सोमवारी व गुरुवारी केळीचे सौदे सुरू राहणार आहेत.

फोटो : २३ आष्टा १

ओळ : आष्टा येथे केळी सौद्याचे उद्घाटन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी झुंजारराव शिंदे, झुंजारराव पाटील, स्नेहा माळी, वैभव शिंदे, विराज शिंदे, माणिक शेळके, अल्लाउद्दीन चौगुले, बाजीराव पाटील, बाळासाहेब इंगळे, निवास गावडे, विजय जाधव उपस्थित हाेते.