शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

शिराळा नगराध्यक्षपदी सुनीता निकम बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:53 IST

शिराळा : शिराळा नगरपंचायत नगराध्यक्षपद निवडीच्या अर्ज माघारीच्या दिवशी गुरुवारी प्रतिभा पवार यांनी अर्ज मागे घेतल्याने, राष्ट्रवादी काँग्रेसच्या ...

शिराळा : शिराळा नगरपंचायत नगराध्यक्षपद निवडीच्या अर्ज माघारीच्या दिवशी गुरुवारी प्रतिभा पवार यांनी अर्ज मागे घेतल्याने, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बांधकाम सभापती सुनीता निकम यांचा एकमेव अर्ज राहिला. त्यामुळे त्यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड निश्चित झाली. शुक्रवारी औपचारिक घोषणा बाकी आहे. दरम्यान, शुक्रवारी उपनगराध्यक्ष पदासाठीही निवड प्रक्रिया होणार आहे.

प्रांताधिकारी नागेश पाटील व सहायक निवडणूक अधिकारी मुख्याधिकारी योगेश पाटील यांच्याकडे सुनीता निकम व प्रतिभा पवार यांनी अर्ज दाखल केले होते. आमदार मानसिंगराव नाईक यांनी दिलेल्या निर्णयानुसार गुरुवारी उमेदवारी अर्ज माघारीच्या दिवशी प्रतिभा पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे बांधकाम सभापती सुनीता निकम यांची नगराध्यक्षपदी निवड निश्चित झाली आहे. फक्त औपचारिक घोषणा बाकी आहे.

शुक्रवार दि. ११ रोजी नगराध्यक्ष निवडीची घोषणा व उपनगराध्यक्ष पदाची निवड होणार आहे. उपनगराध्यक्ष पदासाठी सकाळी १० ते १२ या वेळेत उमेदवारी अर्ज दाखल करणे, तसेच लगेचच छाननी, अर्ज माघारी व वेळ पडल्यास या पदासाठी मतदान होणार आहे.

फोटो-१०सुनीता निकम