शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

शिराळ्याच्या नगराध्यक्षपदी सुनंदा सोनटक्के बिनविरोध

By admin | Updated: June 13, 2017 23:44 IST

शिराळ्याच्या नगराध्यक्षपदी सुनंदा सोनटक्के बिनविरोध

लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : शिराळा नगरपंचायतीच्या पहिल्या नगराध्यक्षा म्हणून राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या सुनंदा गजानन सोनटक्के यांची निवड निश्चित झाली आहे. भाजपने नगराध्यक्षपदासाठी असणारे दोन्ही उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने सोनटक्के नगराध्यक्षपदी विराजमान होत आहेत. याची अधिकृत घोषणा गुरुवार, दि. १५ रोजी होणार आहे. या निवड निश्चितीमुळे राष्ट्रवादीकडून गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.मंगळवारी दुपारी चारपर्यंत नगराध्यक्षपदाच्या उमेदवारी अर्ज माघारीची मुदत होती. या पदासाठी राष्ट्रवादीतर्फे सुनंदा सोनटक्के, भाजपतर्फे अ‍ॅड. नेहा सूर्यवंशी, स्मिता कदम असे एकूण तीन उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. मंगळवारी भाजपच्यावतीने अ‍ॅड. सूर्यवंशी व कदम या दोन्ही उमेदवारांचे अर्ज माघारी घेण्यात आले. अर्ज छाननीवेळी अ‍ॅड. सूर्यवंशी यांनी सोनटक्के यांच्या अर्जाबाबत तक्रार केली होती. त्यावेळी ही तक्रार फेटाळण्यात आली होती. त्यामुळे भाजप पुढील न्यायालयात दाद मागणार का? भाजपतर्फे कोणाचा उमेदवारी अर्ज राहणार, अशी चर्चा होती. मात्र अनपेक्षितपणे दोन्ही अर्ज काढून घेतल्याने या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.मंगळवारी भाजपने दोन्ही उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने सुनंदा सोनटक्के यांचा एकच अर्ज शिल्लक राहिल्याने त्यांची नगराध्यक्ष म्हणून निवड निश्चित झाली आहे. औपचारिक घोषणा गुरुवार, दि. १५ रोजी होणार आहे. ग्रामपंचायत बरखास्त झाली, त्यावेळी सरपंचपदी गजानन सोनटक्के होते, तर आता त्यांच्या पत्नी सुनंदा पहिल्या नगराध्यक्षा म्हणून विराजमान झाल्या आहेत. रिक्षा व्यावसायिक असणाऱ्या सोनटक्के यांच्या कुटुंबात सरपंचपद तसेच आता नगराध्यक्षपद मिळाले आहे.