शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जत तालुक्यात चिंच उत्पादकांना उन्हाळी बोनस : दराचा गोडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 00:39 IST

संख : चवीने आंबट असणारी चिंच यंदा दुष्काळी जत तालुक्यातील शेतकºयांना ‘गोड’ धक्का देण्याची चिन्हे दिसत आहेत. अनुकूल पावसामुळे दुष्काळी भागात चिंचा बहरल्या आहेत.

ठळक मुद्देदर्जानुसार किलोला ५0 ते ७0 रुपयांपर्यंत दर मिळण्याची शक्यता; यंदा आशादायक चित्र

गजानन पाटील ।

संख : चवीने आंबट असणारी चिंच यंदा दुष्काळी जत तालुक्यातील शेतकºयांना ‘गोड’ धक्का देण्याची चिन्हे दिसत आहेत. अनुकूल पावसामुळे दुष्काळी भागात चिंचा बहरल्या आहेत. दुष्काळी भागात विनाखर्च व रोगाची शक्यता सर्वात कमी असलेल्या या चिंचेला यंदा पावसाचे पाणी योग्यवेळी मिळाल्याने अपेक्षेपेक्षा चांगले उत्पादन झाले आहे. त्यामुळे मार्च-एप्रिलमध्ये काढणीला येणाºया चिंचा छोट्या-मोठ्या उत्पादकांना चांगला ‘उन्हाळी बोनस’ देतील, अशी अपेक्षा उत्पादकांतून व्यक्त होत आहे.

 भारतात सर्वत्र आढळणाºया चिंचांची लागवड महाराष्टÑातही सर्वत्र पाहावयास मिळते. तालुक्यातील शेतीच्या बांधावर, पाटालगत, ओढ्यालगत चिंचेच्या झाडांची संख्या मोठ्या प्रमाणावर दिसून येते. शासनाकडून व सामाजिक वनीकरण विभागाकडून रस्त्याच्या कडेला लावण्यासाठी चिंचेच्या झाडांनाच प्राधान्य दिल्याचेही पाहावयास मिळते. मागील काही वर्षांपासून प्रयोगशील शेतकरी चिंचेची शेतीही करू लागले आहेत. त्यामुळे लहान व मोठे चिंचेचे उत्पादक या भागात आहेत. गतवर्षी जुलै ते सप्टेंबरपर्यंत पावसाने समाधानकारक दमदार हजेरी लावली. जून, जुलै महिन्यांत चिंचेला फुलोरा येतो व त्यानंतर चिंचा लागून मार्चपर्यंत त्यांची पूर्ण वाढ होते. त्यामुळे वेळेवर पावसाचे पाणी मिळाल्यानेच यंदा बºयाच झाडांना गतवर्षीपेक्षा चिंचेची लागण अधिक झाली आहे. मोठ्या प्रमाणावर चिंचा झाडांना लगडल्या असून, त्याचा बहर दिसून येत आहे. त्यामुळे मार्च-एप्रिल महिन्यांत या चिंचा काढणीच्यावेळी उत्पादनात वाढ होण्याचे संकेत आहेत. गेल्यावर्षी चिंचेस विक्रमी दर मिळाला होता. यंदा चिंच उत्पादकांना ५० ते ७० रुपये किलोपर्यंत दर्जानुसार दर मिळाल्यास ऐन उन्हाळ्यात चिंचेच्या दराचा उन्हाळी बोनस मिळणार आहे.इतिहासातील चिंच लागवडम्हैसूर संस्थानात चिंच लागवडीत प्राधान्य दिल्याची इतिहासात नोंद आहे. तसेच अहिल्यादेवी होळकर यांच्या इंदोर संस्थानात ३०० वर्षांपूर्वी सुमारे ९०० ते १००० किलोमीटर अंतराच्या रस्त्यावर दुतर्फा चिंचेची झाडे लावण्यात आली आहेत. त्याच्या उत्पादनाची लिलाव पद्धतीने विक्री केल्याची नोंद आहे. 

बहुगुणी चिंच...चिंच चवीला आंबट असली तरी ‘भारतीय खजूर’ म्हणून संबोधण्यात येणारी चिंच सार, चटणी, कोळ, अर्क, गर पावडर, पन्हे, सरबत, औषधे याकरिता उपयोगी आहे. जेवणामध्ये चिंचेचा सर्रास वापर केला जातो. तसेच चिंचेचे लाकूड मऊ व टिकाऊ असल्यामुळे फर्निचर, शेती कामाची औजारे बनविण्यासाठी या लाकडाला मोठी मागणी आहे. सध्या या लाकडाला २६५ रुपये घनफूट भाव मिळत आहे.चिंचेचे आयुर्वेदिक महत्त्वचिंचेच्या १०० ग्रॅम गरामध्ये पाणी २१ टक्के, शर्करा ६७ टक्के, प्रथिने ३ टक्के, तंतुमय ५.६ टक्के, ‘क’ जीवनसत्त्व - ३ गॅ्रम, कॅल्शियम ०.१७ टक्के इतके प्रमाण असते. तसेच आम्लपित्त, पोटाचे विकार, निद्रानाश यासारख्या विविध विकारांवरही चिंचेचे आयुर्वेदिक महत्त्व आहे, तर चिंचोक्यांचा स्टार्च, खळ, पावडर, बुक्का, कुंकू यांच्या निर्मितीत वापर होतो. मुंबई, सोलापूर, मालेगाव, बार्शी येथे चिंचोक्यांपासून खळ निर्मितीचे कारखाने आहेत.