शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

सुमनतार्इंचे नागपुरात उपोषण

By admin | Updated: December 16, 2015 00:14 IST

मागण्यांसंदर्भात आज बैठक : गिरीश बापट यांच्या आश्वासनानंतर उपोषण मागे

तासगाव : ताकारी, म्हैसाळ, आरफळसह अन्य पाणी योजना सुरू कराव्यात, यासह अन्य मागण्यांसाठी आमदार सुमनताई पाटील यांच्यासह काही आमदारांनी मंगळवारी नागपूर येथे विधानभवनासमोर उपोषण केले. संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी गुरुवारी विधानसभा अध्यक्षांच्या उपस्थितीत बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.पाणी योजना सुरू करण्यासह अन्य मागण्यांसाठी आमदार सुमनताई पाटील यांच्यासह गणपतराव देशमुख, जयंत पाटील, विद्या चव्हाण, दीपिका चव्हाण यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर उपोषण केले. अजित पवार, कपिल पाटील यांनी उपोषणास पाठिंंबा दिला. ताकारी, म्हैसाळसह आरफळ योनजेचे पाणी चालू करा, या योजनांचे वीज बिल टंचाईतून भरा, या योजनेची थकबाकी माफ करा, तसेच तासगाव-कवठेमहांकाळ मतदार संघातील मटका व अवैध धंदे बंद करा, राज्यात डान्स बार बंदी कायम करण्याचा कायदा करा, यांसह अन्य मागण्या करण्यात आल्या.संसदीय कार्यमंत्री बापट यांनी सभागृहाबाहेर येऊन उपोषण सोडण्याची विनंती केली. अजित पवार यांनी उपोषणकर्त्यांच्या मागण्यांबाबत विचारणा केली. त्यावर गुरुवारी विधानसभा अध्यक्षांच्या दालनात अधिकाऱ्यांची बैठक बोलावून, योजना सुरु करण्यासाठी शासन ठोस निर्णय घेईल, असे बापट यांनी सांगितले. त्यानंतर अजित पवार आणि जयंत पाटील यांनी उपोषण मागे घेत असल्याचे बापट यांना सांगितले. (वार्ताहर)तासगावकर पाठीशी : आज उपोषण आमदार सुमनताई पाटील यांनी, तालुक्यातील पाणी योजना तातडीने सुरु व्हाव्यात, या मागणीसाठी नागपुरात विधानभवनासमोर उपोषण केले. त्यांच्या या मागणीला पाठिंबा देण्यासाठी तासगावात दि. १६ रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. तहसील कार्यालयासमोर सकाळी दहा हे वाजता उपोषण करण्यात येणार असून याबाबतचे निवेदन तहसीलदार सुधाकर भोसले यांना देण्यात आले असल्याची माहिती तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अविनाश पाटील यांनी दिली.