हणमंत कदम यांनी मुदत संपल्याने मागील महिन्यात राजीनामा दिल्याने पद रिक्त होते. विरोधी शिवसेनेचे पाच सदस्य गैरहजर होते.
लोकनियुक्त सरपंच सुरेश ओंकारे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उपसरपंच निवड बैठकीला १२ सदस्य उपस्थित होते. ग्रामविकास अधिकारी उमेश नवाळे यांनी निवड प्रक्रिया पार पाडली. सुखदेव गोसावी यांचा एकमेव अर्ज आल्याने, निवड बिनविरोध जाहीर करण्यात आली.
मागील पंचवार्षिकमध्येही आघाडीच्याच माध्यमातून गोसावी यांना उपसरपंचपदी संधी मिळाली होती. सुखदेव गोसावी यांना दुसऱ्यांदा संधी मिळाल्याने गोसावी समाजात उत्साहाचे वातावरण झाले आहे.
चाैकट
... म्हणून गैरहजर
मागील वेळी हणमंत कदम यांच्या निवडीवेळी उपस्थित राहणारे शिवसेनेचे पाच सदस्य यावेळी मात्र गैरहजर राहिले. मागील वेळेप्रमाणे विश्वासात न घेता नवीन चेहऱ्याला संधी न दिल्याने आम्ही गैरहजर राहिलो, असे सेनेचे गटनेते पांडुरंग इंगळे यांनी सांगितले.