शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या मारहाणीमुळे महिलेची आत्महत्या

By admin | Updated: September 5, 2016 00:16 IST

नातेवाइकांचा आरोप : खूनप्रकरणी घेतले होते चौकशीसाठी ताब्यात; जतमधील घटना

 जत : ट्रॅक्टर चालकाच्या खूनप्रकरणी तब्बल दोनवेळा पोलिसांनी ताब्यात घेऊन मारहाण केल्याने सावित्री शिवाजी गडदे (वय २८, रा. तंगडी मळा, जत) या महिलेने पेटवून घेऊन आत्महत्या केली. रविवारी दुपारी ही घटना घडली. पोलिसांच्या मारहाणीला घाबरून तिने हे कृत्य केल्याची तक्रार तिच्या नातेवाइकांनी केली आहे. जत पोलिसांच्या चौकशीनंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागानेही सावित्री यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते, अशी चर्चा सुरू आहे. सावित्री गडदे यांचे दीर प्रवीण गडदे यांनी जत पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जतच्या तंगडी मळ्यातील ट्रॅक्टरचालक विलास अण्णाप्पा चव्हाण (४५) यांचा ३० आॅगस्टला रात्री दहा वाजता खून करण्यात आला होता. या खूनप्रकरणी जत पोलिसांनी ३ सप्टेंबरला सावित्री गडदे यांना सायंकाळी पाच वाजता चौकशीसाठी बोलावून घेतले होते. सावित्री या सासूला सोबत घेऊन पोलिस ठाण्यात गेल्या होत्या. पोलिसांनी सासूला बाहेर बसण्यास सांगितले व सावित्री यांची चौकशी केली. यादरम्यान त्यांना शारीरिक (पान १ वरून) व मानसिक त्रास दिला. त्यांना पोलिस गाडीतून शासकीय विश्रामगृहाजवळ पांढरा बंगला येथे नेऊन बेदम मारहाण केली. याचा सावित्री यांना मानसिक धक्का बसला. तसेच मारहाणीला घाबरून त्यांनी रविवारी दुपारी १ च्या सुमारास राहत्या घरी पेटवून घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणाची राज्य गुन्हे अन्वेषण (सीआयडी) विभागामार्फत चौकशी करावी. सावित्री गडदे यांचे सोन्याळ हे माहेर, तर बाज (ता. जत) हे सासर आहे. त्या पती, दोन मुले, सासू व सासरा यांच्यासमवेत जतच्या तंगडी मळ्यात राहत होत्या. तिथे त्यांनी शेतजमीन विकत घेतली होती. गेल्या पंधरा वर्षांपासून हे कुटुंब तंगडी मळ्यात वास्तव्यास आहे. सावित्री यांचे पती शिवाजी हे शनिवारी रात्री घरगुती कामासाठी मुंबईला गेले होते. रविवारी दुपारी त्यांच्या घरी कोणीच नव्हते. त्यावेळी त्यांनी पेटवून घेतले. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. (वार्ताहर) उमदीनंतर जत पोलिस संशयाच्या भोवऱ्यात तीन महिन्यांपूर्वी उमदीला एका महिलेचा खून झाला होता. या खूनप्रकरणी उमदी पोलिसांनी चंद्रशेखर नंदगोड या कर्नाटकातील संशयितास ताब्यात घेतले. त्याला तीन दिवस डांबून ठेवून मारहाण केली होती. या मारहाणीला घाबरुन नंदगोड याने पोलिस ठाण्यातील शौचालयात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणी दोन पोलिस अधिकाऱ्यांसह तिघांविरुद्ध गुन्हा नोंद आहे. या प्रकरणाचा सीआयडीकडून अजून तपास पूर्ण झालेला नसतानाच, जतमध्ये खूनप्रकरणीच चौकशीला ताब्यात घेतलेल्या सावित्री गडदे या महिलेनेही पोलिसांच्या मारहाणीला घाबरुन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. रुग्णालयात तणाव सावित्री गडदे यांचा मृतदेह विच्छेदनासाठी जत ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला, त्यावेळी नातेवाइकांनी मोठी गर्दी केल्याने तणाव निर्माण झाला होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. रात्री उशिरापर्यंत जत पोलिसांत या घटनेची नोंद नव्हती. गडदे यांंचा भाजून मृत्यू झाल्याची नोंद होती.