शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

चिमुरडीसह मातेची विहिरीत आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2016 01:22 IST

जत तालुक्यातील अंतराळ येथील घटना

जत : तालुक्यातील अंतराळ येथील रेणुका ऊर्फ अर्चना राहुल बुरुटे (वय १९) यांनी स्वत:च्या प्रांजली (१० महिने) या मुलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी सकाळी आठच्या दरम्यान घडली. आत्महत्येमागील नेमके कारण समजू शकले नाही. याप्रकरणी बाळासाहेब शंकर बुरुटे (रा. शेगाव, ता. जत) यांनी जत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. रेणुका व राहुल बुरुटे यांचा तीन वर्षांपूर्वी विवाह झाला. रेणुका यांचे माहेर रेड्डे (ता. मंगळवेढा) आहे. त्यांना दहा महिन्यांची एक मुलगी असून, राहुल शेतमजूर आहेत. अंतराळपासून सुमारे दोन किलोमीटरवर आवंढी रस्त्यावरील बुरुटे मळ्यात रेणुका, पती राहुल, सासू विमल, सासरा मारुती, नणंद वैशाली, दीर विनोद व जाऊ असे एकत्रित आठजणांचे कुटुंब राहते. रेणुका व राहुल या पती-पत्नीमध्ये किरकोळ कारणावरून सतत वाद-विवाद होत असल्यामुळे रेणुका यांचे वडील यशवंत मारुती कांबळे रविवारी अंतराळ येथे आले होते. दोघांना समजावून सांगून ते सोमवारी निघून गेले होते. रेणुका राहत असलेल्या घरापासून जवळच शिवाजी गेनू बुरुटे यांची विहीर आहे. रेणुका बुधवारी सकाळी मुलीसह घरातील कोणालाही न सांगता विहिरीवर गेल्या. तेथून त्यांनी पती राहुल यांना दूरध्वनी करून आत्महत्या करणार असल्याचे सांगितले. वडिलांनाही दूरध्वनी करून लवकर येण्यास सांगितले. त्यानंतर त्यांनी चप्पल विहिरीच्या काठावर सोडून त्यावर मोबाईल ठेवला. डोक्याला बांधलेला स्कार्फ सोडून त्यांनी प्रांजलीला त्याच स्कार्फने स्वत:च्या पोटाला बांधून घेऊन विहिरीत उडी मारली. राहुल डेअरीत दूध घालण्यासाठी शेगाव येथे गेले होते. दूरध्वनी आल्यानंतर ते तत्काळ विहिरीकडे धावले. तेथील नागरिकांना बोलावून घेऊन त्यांनी रेणुका व प्रांजली यांना बाहेर काढले; पण त्यापूर्वीच दोघी मायलेकींचा मृत्यू झाला होता.दरम्यान, रेणुका यांनी आत्महत्या केली नसून, सासू, सासरा, दीर, पती, जाऊ व नणंद यांनी संगनमताने खून करून त्यांना विहिरीत ढकलून दिले आहे. सासरकडून सतत मारहाण करून तिचा पैशासाठी मानसिक छळ केला जात होता, अशी तक्रार रेणुका यांचे वडील यशवंत कांबळे व आई रुक्मिणी कांबळे यांनी जत पोलिसांत केली आहे; परंतु या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. पुढील तपास पोलीस हवालदार किरण कांबळे व दिग्विजय कराळे करीत आहेत. (वार्ताहर)