सांगली : शहरातील हनुमाननगर परिसरातील तरुणाने फॅनला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. अमोल कल्लापा हडपत (वय २०) असे त्याचे नाव असून, शुक्रवारी दुपारी पावणेदोनपूर्वी ही घटना घडली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वीसवर्षीय अमोल हा आई, वडील, दोन बहिणी यांच्यासमवेत हनुमाननगर येथील पहिल्या गल्लीत राहण्यास आहे. तो सराफ दुकानात कामगार म्हणून काम करत होता. शुक्रवारी दुपारी घरी कोणी नसताना स्वयंपाक घरामध्ये त्याने फॅनला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतला. कुटुंबीय घरी आल्यानंतर त्यांना आत्महत्येचा प्रकार निदर्शनास आला. त्यानंतर त्यास उपचारासाठी तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. या घटनेची पोलिसात नोंद असून, आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.
---------------------
फोटो २५ अमोल हडपत नावाने एडीटोरियल