शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

फसवणुकीतील संशयिताची आत्महत्या

By admin | Updated: February 27, 2017 00:11 IST

गळफास घेतला; सांगलीतील डॉक्टरला गंडा प्रकरण

सांगली/कळे : विश्रामबाग येथील डॉक्टरला सात लाखांचा गंडा घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या १२ तासांत सचिन विठ्ठल येरुडकर (वय ३२, रा. घरपण, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) या संशयिताने आत्महत्या केली. घरपण येथे त्याच्या घरी रविवारी सकाळी घटना घडली. हेमंत पाटील, डॉ. शरद सावंत यांची नावे असलेली चिठ्ठी पोलिसांना सापडली आहे.डॉक्टरांच्या मुलाला एमबीबीएसला प्रवेश मिळवून देतो, असे आमिष दाखविल्याची तक्रार आहे. बुर्ली (ता. पलूस) येथील जिल्हा परिषद सदस्य हेमंत पाटील, सचिन यरुडकर व माळी (पूर्ण नाव निष्पन्न नाही) या तिघांनी संगनमत करून मुलाच्या प्रवेशासाठी सात लाखांची मागणी केली. दि. २४ ते २६ जुलै २०१६ या कालावधित सात लाखांची ही रोकड त्यांनी डॉक्टरच्या रुग्णालयातून घेतली होती. याला आठ महिने झाले तरीही संशयितांनी एमएबीबीएसला प्रवेश मिळवून दिला नाही.त्यामुळे डॉक्टरने पैसे परत मागितले. यावर हेमंत पाटील, यरुडकरसह तिघांनी पैसे देण्यास नकार देऊन, तुला काय करायचे ते कर, तुला बघून घेतो, अशी धमकी दिली. त्यामुळे डॉक्टरने शनिवारी रात्री उशिरा विश्रामबाग पोलिसात फिर्याद दाखल केली होती. गुन्हा दाखल झाल्याची चाहूल लागताच यरुडकर याने रविवारी सकाळी घरपण येथील घरातील दुसऱ्या मजल्यावर गळफास घेऊन आत्महत्या केली. यरुडकर यांची पत्नी कामानिमित्त दुसऱ्या मजल्यावर गेल्यानंतर आत्महत्येचा हा प्रकार उघडकीस आला. आत्महत्या करण्यापूर्वी यरुडकर यांनी चिठ्ठी लिहिली आहे. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीतील मजकूर ‘नमस्कार, मी सचिन विठ्ठल येरूडकर, माझा या डॉक्टर प्रकरणात कोणताही संबंध नसून माझे नाव कारण नसताना या प्रकरणात घातले आहे. या प्रकरणात डॉक्टर यांनी मला गोवले आहे. तरी मी आत्महत्या करीत आहे. यासाठी हेमंत पाटील, डॉ. शरद सावंत हे असून, यांना जबाबदार धरण्यात यावे. कळावे आपला सचिन येरूडकर, सही’ असा मजकूर आहे. अशा आशयाची चिठ्ठी सचिनच्या पँटच्या खिशात सापडली.पोलिस पोहोचले; पण...गुन्हा दाखल झाल्याने संशयित फरारी होतील, असा विचार करुन विश्रामबाग पोलिसांची दोन पथके बुर्लीत हेमंत पाटील व यरुडकर याच्या शोधासाठी घरपण येथे रविवारी सकाळी रवाना झाली होती. पोलिस यरुडकरच्या घरात पोहोचले. परंतु यरुडकर याने आत्महत्या केल्याचे समजताच पोलिसांना धक्का बसला. स्थानिक पोलिसांकडून या घटनेची माहिती घेऊन पथक दुपारी हात हलवित सांगलीत परतले.