शहरं
Join us  
Trending Stories
1
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
2
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
3
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
4
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
5
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
6
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
7
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
8
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
9
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल
10
भारताला चीनपासून सर्वात मोठा धोका, चहुबाजूंनी घेरण्यासाठी विणतोय जाळं, अमेरिकेच्या गोपनीय अहवालातून गौप्यस्फोट 
11
GT ला मोठा धक्का! CSK वर पहिल्यांदाच आली तळाला राहण्याची वेळ; पण जाता जाता त्यांनी MI ला दिलं गिफ्ट
12
निरा डावा कालव्याला भगदाड..! बारामती परिसरात नागरिकांच्या घरात-शेतात पाणीच पाणी
13
धक्कादायक! चेंजिंग रूममध्ये कॅमेरा बसवला होता, महिलांचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ व्हायरल
14
'...तर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही', जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री फडणवीसांना थेट इशारा
15
"मी एका खोलीच्या घरात राहतो, कर्जबाजारी..."; सीबीआयच्या आरोपपत्रावर सत्यपाल मलिक म्हणाले,...
16
पीएम मोदींचा पाकिस्तान दौरा अन् 2016 चा पठाणकोट हल्ला..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
17
ऑपरेशन सिंदूरमधील नामुष्कीनंतर पाकिस्तान सुधरेना, अण्वस्त्रांबाबत रचतोय भयंकर डाव, अमेरिकेच्या अहवालातून गौप्यस्फोट
18
दुसरी मुलगी झाली म्हणून टोमणे; अमरावतीत ‘सीएचओ’ची आत्महत्या
19
व्लादिमीर पुतीन यांच्या हेलिकॉप्टरवर युक्रेनकडून ड्रोन हल्ला, बालंबाल बचावल्याचं वृत्त   
20
Monsoon Update : आनंदाची बातमी! या राज्यांमध्ये मान्सूनचे दमदार आगमन; मुसळधार पावसाचा इशारा, महाराष्ट्रात कधी येणार?

सफाई कर्मचाऱ्याची कर्जास कंटाळून मिरजेत आत्महत्या

By admin | Updated: June 28, 2014 00:43 IST

मिरज : मिरजेतील वैरण बाजार परिसरात महावीर ऊर्फ नाना कृष्णा होवाळे (वय ५०) या महापालिका सफाई कामगाराने कर्जाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली.

मिरज : मिरजेतील वैरण बाजार परिसरात महावीर ऊर्फ नाना कृष्णा होवाळे (वय ५०) या महापालिका सफाई कामगाराने कर्जाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. आज, शुक्रवारी सकाळी होवाळे यांनी घरातील स्वच्छतागृहात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याची चिठ्ठी त्यांनी लिहून ठेवली होती. कर्ज वसुलीसाठी तगादा लागल्याने ते गेले चार दिवस अस्वस्थ होते. त्यातून त्यांनी आत्महत्या केल्याची कुटुंबीयांची तक्रार आहे. महापालिकेच्या स्विपर्स कॉलनीत होवाळे कुटुंबीय राहतात. महावीर होवाळे यांची पत्नी वैशाली होवाळे याही महापालिकेत सफाई कर्मचारी आहेत. होवाळे यांना मद्यपानाची सवय होती. त्यासाठी त्यांनी काहीजणांकडून कर्ज घेतले होते. एलबीटीमुळे महापालिकेचा पगार अनियमित मिळत असल्याने कर्जाऊ दिलेल्या पैशांसाठी काहीजणांनी तगादा लावला होता. यामुळे गेले चार दिवस ते अस्वस्थ होते. कर्जाला कंटाळून आज सकाळी पत्नी कामावर गेल्यानंतर त्यांनी स्वच्छतागृहात आत्महत्या केली.होवाळे यांनी मृत्युपूर्वी लिहून ठेवलेल्या दोन चिठ्ठ्या पोलिसांना सापडल्या. एका चिठ्ठीत पत्नीस उद्देशून मुलांचा व्यवस्थित सांभाळ कर, असा मजकूर आहे, तर दुसऱ्या चिठ्ठीत कर्जाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे म्हटले आहे. महापालिकेतील काही कर्मचारी खासगी सावकारी करीत असून, त्यांनी अनेक चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना कर्ज दिले आहे. या कर्जाची सक्तीने वसुली करण्यात येते. गेले सहा महिने महापालिका कर्मचाऱ्यांना पगार वेळेवर मिळत नसल्याने खासगी सावकारीत वाढ झाली आहे. महावीर होवाळे या सावकारीचा बळी ठरल्याची तक्रार कुटुंबीयांनी केल्याने मिरज शहर पोलीस सावकाराचा शोध घेत आहेत. (वार्ताहर)