शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

सुहास शिंदे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:27 IST

वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापशेठ साळुंखे, आटपाडीचे नेते तानाजी पाटील, खानापूर पंचायत समितीचे ...

वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापशेठ साळुंखे, आटपाडीचे नेते तानाजी पाटील, खानापूर पंचायत समितीचे सभापती महावीर शिंदे यांच्या उपस्थितीत मातोश्री चॅरिटेबल ट्रस्टला रुग्णवाहिका प्रदान करण्यात आली.

या वेळी खानापूरचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक, नगरसेविका यांच्यातर्फे सुहास शिंदे यांना चांदीची गणेशमूर्ती भेट देण्यात आली. गरजूंना दोनशे आटा चक्की अल्प दरात देण्यात आल्या.

हिवरे येथील निखिल हसबे व सुधीर पाटील यांनी जिल्हा परिषद शाळा व हिवरे हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. खानापूरमधील प्रभाग १ मध्ये शोभादेवी पवार इंग्लिश स्कूलने गौरी-गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन केले होते. प्रथम क्रमांकाला पैठणी देऊन सहभागी स्पर्धकांना संसारोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. प्रभाग सातमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्या वतीने घरोघरी संसारोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. प्रभाग २ मध्ये नगराध्यक्षा स्वाती टिंगरे यांनी सेवालाल ग्रुपला आटा चक्की भेट दिली.

घाटमाथ्यावरील पळशी, भिवघाट, बेणापूर, करंजे, मोही आदी ठिकाणी कार्यकर्त्यांनी वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा केला.

शुभेच्छा देण्यासाठी खासदार संजयकाका पाटील, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील, मनमंदिर उद्योग समूहाचे अशोकराव गायकवाड, खानापूर पंचायत समितीचे सभापती महावीर शिंदे, उपसभापती सारिका माने, नगराध्यक्षा स्वाती टिंगरे, उपनगराध्यक्ष भारत सरगर, माजी जिल्हा परिषद सदस्य फिरोज शेख, भाऊसाहेब पाटील, माजी उपसभापती यशवंत हसबे, बाजार समितीचे माजी सभापती चंद्रकांत चव्हाण, राहुल साळुंखे, राष्ट्रवादीचे राजूशेठ जानकर, अनिलशेठ पाटील, संभाजी जाधव, गणपतराव भोसले, कृष्णदेव जाधव, सदाशिव हसबे यांची प्रमुख उपस्थिती होती.

डीपीआयचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस संदीप ठोंबरे, लेंगरेचे माजी सरपंच श्रीरंग शिंदे, प्रकाशतात्या कदम, संतोष बागल, राजेंद्र कुंभार, वस्ताद साहेबलाल शेख, प्रकाश शिंदे, सर्जेराव शिंदे, प्रशांत शिंदे, उदय शिंदे, शेखर सरोदे, हर्षवर्धन माने, माजी नगराध्यक्ष अलीअकबर पिरजादे, भारती माने, माजी उपनगराध्यक्ष ज्ञानदेव बाबर, ढवळेश्वरचे उपसरपंच दिलीप किर्दत, सरपंच सज्जन बाबर, हिवरेचे सरपंच रामकृष्ण सुतार, रामनगरचे सरपंच अभय थोरात, ताडाचीवाडीचे सरपंच अनिल मंडले, मानेवाडीचे सरपंच अमोल खरात, पोसेवाडीचे माजी सरपंच श्रीकांत जाधव, माजी सरपंच दादासाहेब उबाळे, धोंडेवाडीचे सरपंच महेंद्र घोरपडे, करंजेचे पोपट माने, जाधववाडीचे सरपंच प्रकाश जाधव, भडकेवाडीचे सरपंच संजय पाटील, करंजेचे सरपंच कलावती रास्ते, पळशीचे दीपक जाधव, संभाजी जाधव, प्रशांत जाधव, विशाल जाधव, गायत्री कन्स्ट्रक्शनचे प्रकाश भोसले-कोळे, राजेश देशमुख, अरविंद देशमुख, फिरोज आतार, माजी सरपंच मारुती हत्तीकर यांनी शुभेच्छा दिल्या. जिल्ह्यातील अनेक नेत्यांनी फोनवरून सुहास शिंदे यांना शुभेच्छा दिल्या.

फाेटाे : १८ खानापुर १

ओळ : खानापूर येथे सुहास शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त सुहास बाबर, डॉ. उदय हजारे व मान्यवरांच्या उपस्थितीत रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले.

फोटो : १८ खानापुर २

ओळ : खानापूर येथे खासदार संजय पाटील यांच्यासह मान्यवरांनी सुहास शिंदे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.