शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

सुहास बाबरांचे आंदोलन पावसाळ्यात उगविणाऱ्या छत्रीसारखे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:31 IST

मंगळवारी विटा ते मायणी रोडवर सुहास बाबर यांनी नगरपालिकेच्या विरोधात आंदोलन केल्यानंतर माजी नगराध्यक्ष पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे या आंदोलनाचा ...

मंगळवारी विटा ते मायणी रोडवर सुहास बाबर यांनी नगरपालिकेच्या विरोधात आंदोलन केल्यानंतर माजी नगराध्यक्ष पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे या आंदोलनाचा समाचार घेतला.

वैभव पाटील म्हणाले, मायणी रोडवरच्या पुलाचे रुंदीकरण व डांबरीकरणाचे विकास काम हे विटा नगरपरिषदेतर्फे रितसर सुरू आहे. रुंदीकरणानंतर रस्ता करण्यापूर्वी रस्त्याची लेवल एकसारखी करण्याकामी मुरूम भरावा करून डांबरीकरण केले आहे. या परिसरातील चव्हाण परिवाराच्या इमारतीमधील बेसमेंटला जमा होणारे पावसाचे पाणी बाहेर काढून याच ओढापात्रात सोडण्यासाठी त्यांनी रितसर अर्ज देऊन त्यांच्या इमारतीपासून ओढ्यापर्यंत जेसीबीने खुदाई करून चर काढली आणि पाईपलाईन केली. यामध्ये तयार झालेल्या खड्ड्यात एक ट्रक अडकण्याची दुर्दैवी घटना घडली. हा ट्रक काढून रस्त्याचे व पुलाचे डांबरीकरण काम प्रगतीपथावर येणारच होते.

सुहास बाबर यांना रस्त्याचा व विट्याचा एवढा पुळका असेल, तर प्रथम सांगली रोडवरच्या तीन ओढ्यांवरच्या पुलाची देखभाल-दुरुस्ती करावी. माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनी स्वमालकीची जागा विनामोबदला शासनास देऊन तालुका क्रीडा संकुल बांधले. त्याच्या दुरवस्थेबद्दल बोलावे व मग विटा नगरपरिषदेच्या कारभारावर बोलावे. सवंग प्रसिद्धीसाठी त्यांनी केलेल्या आंदोलनाची दखल घ्यायची आम्हास व विटेकरांनाही गरज नाही. विटेकर सूज्ञ आहेत. तरीही गैरसमज पसरू नयेत, म्हणून हा खुलासा केला असल्याचे वैभव पाटील म्हणाले.

चौकट

ज्यांनी भ्रष्ट कारभाराने साखर कारखाना, सूतगिरणी, पतसंस्था, बँका संपविल्या, ज्यांना गेल्या ४० वर्षांच्या राजकारणात एकही नवी संस्था सुरू केली नाही. स्वतःच्या गार्डी गावाचा पाणी, रस्त्याचा प्रश्न सोडविता आला नाही, ज्यांच्या गावाची स्मशानभूमी मोडकळीस आली आहे, त्यांनी विकासकामे व भ्रष्टाचारावर बोलणे हा जगातील सर्वात मोठा विनोद असल्याची टीका वैभव पाटील यांनी केली.