शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

घाटमाथ्यावर उसाला तुरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:38 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क घाटनांद्रे : कवठेमहांकाळ तालुक्याचा आर्थिक कणा समजल्या जाणाऱ्या महांकाली सहकारी साखर कारखान्याचे धुराडे चालूवर्षी न पेटल्याने ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

घाटनांद्रे : कवठेमहांकाळ तालुक्याचा आर्थिक कणा समजल्या जाणाऱ्या महांकाली सहकारी साखर कारखान्याचे धुराडे चालूवर्षी न पेटल्याने त्याचा मोठा फटका ऊस उत्पादक शेतकरना बसत आहे. तयार झालेल्या ऊसाचा वेळेत उठावच होत नसल्याने सध्या उसाला तुरे फुटू लागले आहेत. परिणामी उत्पादन घटण्याची भीती निर्माण होत आहे.

गेल्या काही वर्षात तालुक्यात म्हैसाळ व टेंभूचे पाणी नियमितपणे मिळत आहे. गेल्या दोन वर्षापासून वरुणराजानेही चांगलीच कृपादृष्टी दाखविल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांनीही नगदी पीक म्हणून ऊस लागवडीस मोठी पसंती दिली आहे. त्यामुळे आपसुकच दुष्काळी गणल्या जाणाऱ्या कवठेमहांकाळ तालुक्यात उसाचे क्षेत्रही मोठ्या प्रमाणात वाढले. परंतु सततच्या दुष्काळाने व काही अपरिहार्य कारणामुळे रडतखडत चाललेला तसेच संपूर्ण तालुक्याचे लक्ष असलेला महांकाली सहकारी साखर कारखाना चालूवर्षी सुरूच हाेऊ शकला नाही. त्याचा मोठा फटका ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. त्यामुळे मोठ्‌या प्रमाणात पिकविलेल्या उसाचा प्रश्न निर्माण झाला.

सध्या कवठेमहांकाळ तालुक्यात उगार शुगर, केंपवाड कारखाना, दत इंडिया सांगली, रेणुका शुगर अथणी, तासगाव कारखान्याच्या टोळ्या ऊस ताेडीसाठी सक्रिय झाल्या आहेत. पण चालूवर्षी सर्वत्र उसाचे प्रमाण जास्त असल्याने हे कारखानेही पहिल्यांदा त्यांच्या कार्यक्षेत्रातील उसाला प्राधान्य देत आहेत. त्यामुळे तालुक्यातील उसाच्या तोडीसाठी बळीराजाला चांगलीच वाट पाहावी लागत आहे.

त्यामुळे उसाची तोडणी लवकर होत नसल्याने उसाला तुरे फुटू लागले आहेत. त्यामुळे उसाच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या चिंतेत मोठी वाढ झाली आहे.

फोटो : १३ घाटनांद्रे १

ओळी : कवठेमहांकाळ-जाधववाडीदरम्यानच्या शेतीत ऊसास आलेले तुरे.