शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

साखर कारखानदारांच्या काटामारीला ऊत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 23:21 IST

सांगली : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी ऊस दर कमी दिला आहे. त्याचबरोबर आता वजनात काटामारी करुन काही साखर कारखाने पुन्हा ...

सांगली : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी ऊस दर कमी दिला आहे. त्याचबरोबर आता वजनात काटामारी करुन काही साखर कारखाने पुन्हा शेतकऱ्यांची लूट करीत असल्याचा ऊस उत्पादकांचा आरोप आहे. कारखान्याच्या आणि बाहेरच्या काट्यावरील वजनात दीड-दोन टनाचा फरक पडत असल्याच्या शेतकºयांच्या तक्रारी आहेत.सध्या ऊस दरापेक्षा काटामारी हाच चर्चेचा विषय आहे. साखर कारखान्यांमध्ये इलेक्ट्रॉनिक वजन-काटे बसविलेले असूनही त्यात मोठ्या प्रमाणात काटामारी केली जाते. शेतकरी संघटनाही ऊस दराच्या आंदोलनात यशस्वी होतात, पण काटामारी रोखण्यात मात्र अपयशी ठरतात. संघटनांनी जाब विचारल्यावर, कारखानदार काटामारीचा आरोप फेटाळून लावत आहेत.प्रत्येक ट्रॅक्टरमधून सरासरी १५ ते २० टन, तर ट्रकमधून १२ ते १५ टन उसाची वाहतूक केली जात आहे. अशा ट्रक अथवा ट्रॅक्टरमागे दीड ते दोन टन काटामारी केली जाते. या साखर कारखान्यांवर संबंधित विभागाच्या अधिकाºयांचा फारसा अंकुश नसल्याचाही आरोप आहे. तपासणीपूर्वी अधिकाºयांकडून वजन-काट्याच्या तपासणीची कल्पना कारखानदारांना दिल्यामुळे काटामारीची यंत्रणा बंद ठेवली जाते. त्यामुळे अधिकारी तपासणीनंतर लगेच कारखान्याचा वजन-काटा उत्तम असल्याचे प्रमाणपत्र देतात.जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांच्या वजन-काट्यांची एकाचवेळी अचानक तपासणी केल्यास गोलमाल उजेडात येऊ शकते.शेतकरी स्वत: वजन करायला जात नाही; पण शेतकरी आणि ऊस तोडणारे मजूर नजरेने वाहनामध्ये ऊस किती टन आहे, हे ओळखतात. काही शेतकºयांनी अन्य काट्यावर वजन करून ऊस नेला तर तो ऊस कारखानदार स्वीकारत नसल्याच्या तक्रारी आहेत.खासगी वजन काटे ‘मॅनेज’खासगी वजनकाटे चालविणाºयांना साखर कारखान्यांकडून हप्ते मिळतात. त्यामुळे एखाद्या शेतकºयाने तेथे वजन केल्यास ती माहिती साखर कारखान्याला त्वरित कळविली जाते. यावर पर्याय म्हणून खासदार राजू शेट्टी यांनी खासदारांच्या स्थानिक विकासनिधीतून ग्रामपंचायतींना वजन काटे देण्याची व्यवस्था केली आहे. मात्र साखर कारखान्यांचा दबाव असणाºया ग्रामपंचायती अशाप्रकारचा निधी घेण्यास तयार होत नाहीत.वाहन मालक व मजुरांनाही फटकाऊसतोडणी मजुराला मजुरी वजनावर मिळते. उसाची वाहतूक करणाºयांना भाडे वजनावर मिळते. त्यामुळे काटा मारल्यानंतर शेतकºयांचे तर नुकसान होतेच, पण ऊस तोडणाºया मजुरांचे आणि वाहतूक करणाºया वाहनमालकांचेही नुकसान होते.‘कारखाने बंद पाडू’काही साखर कारखाने वजनात काटामारी करीत असल्याच्या तक्रारी आहेत. याबाबत लवकरच वैधमापन विभागाकडे लेखी तक्रार करू. त्यांनी कारवाई केली तर ठीक़, नाही तर कारखान्यांचे हंगाम बंद पाडू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विकास देशमुख यांनी दिला आहे.