शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

चित्रपट, मालिकांमध्ये स्त्रीच्या बौद्धिक सामर्थ्याला गौणत्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : स्त्रीच्या बौद्धिक सामर्थ्याला आणि सौंदर्याला गौणत्व देऊन, तिचे शारीरिक सौंदर्य उत्तानपणे प्रेक्षकांपुढे वारंवार ...

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : स्त्रीच्या बौद्धिक सामर्थ्याला आणि सौंदर्याला गौणत्व देऊन, तिचे शारीरिक सौंदर्य उत्तानपणे प्रेक्षकांपुढे वारंवार दाखवणारे सिनेमे आणि मालिका यांचा समाजमनावर अतिशय विपरीत परिणाम होतो. त्यातून स्त्रियांवरील अन्याय-अत्याचारात भरच पडते, असे मत अमळनेरच्या साने गुरुजी स्मारक समितीच्या कार्यवाह आणि सामाजिक कार्यकर्त्या दर्शना पवार यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा महिला विभाग व सोशल व्यवस्थापन विभाग यांच्यातर्फे आयोजित तीन दिवसीय व्याख्यानमालेतील, ‘गुंफू हातांमध्ये हात, फुलू सारे एक साथ’ या मुख्य विषयांतर्गत, ‘चित्रपट- मालिका व स्त्री प्रतिमा’ या विषयावर दुसरे पुष्प गुंफताना दर्शना पवार बोलत होत्या.

त्या पुढे म्हणाल्या, जाहिरातीतील वस्तूंचे मूल्य हे स्त्रीच्या आत्मसन्मानापेक्षा मोठे असत नाही. हतबल झालेली, सतत अन्याय सोसणारी, असहाय अशी स्त्रीदृष्ये अनेक चित्रपटात दाखवली जातात. पण त्यामुळे समाजातील प्रश्न सुटण्याऐवजी निर्ढावत जातात. स्त्री ही जन्मत:च सहनशील नसते. ते तिच्यावर लादले जाते.

कोणत्याही सांस्कृतिक कार्यक्रमात स्वागतासाठी महिला, मुलींचा पुढाकार महत्त्वाचा मानला जातो. त्या कार्यक्रमातील विचार आणि त्याचा अंगीकार महत्त्वाचा असतो. मात्र हे लक्षात न घेता, वरवरच्या गोष्टींना महत्त्व दिले जाते. त्यातच वेळ, श्रम, पैसा खर्च होतो.

स्त्रीप्रश्नावर काम करणाऱ्या महिलांबाबत अनेक चित्रपटांमध्ये हेटाळणी, तिरस्कारयुक्त भूमिका असल्याचे दाखवले जाते. त्यामुळे वास्तवात काम करणाऱ्या स्त्रियांकडेही समाज त्या दृष्टीनेच बघतो. हे अत्यंत वेदनादायी आहे. त्यातून महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या विचार वारशाला धक्का पोहोचवणारे आहे. स्त्रीने स्वत:चे निर्णय घेण्यासाठी, तिला कुटुंबीयांनी, समाजाने मोकळीक दिली पाहिजे, अशी अपेक्षा पवार यांनी व्यक्त केली.