शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

अपूर्ण कामांबाबत फौजदारी दाखल करा

By admin | Updated: August 27, 2014 23:17 IST

सीईओंचे आदेश : ‘भारत निर्माण’चा बट्ट्याबोळ

मिरज : मिरज तालुक्यातील सात गावांत भारत निर्माण योजनेच्या अपूर्ण कामांबाबत अध्यक्ष, सचिव, ठेकेदार व तांत्रिक सल्लागारांवर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांच्या मालमत्तेवर बोजा चढविण्याचे आदेश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती पंचायत समिती छोटे पाटबंधारे विभागाचे प्रभारी अभियंता एकनाथ नागरगोजे यांनी दिली. मिरज तालुक्यातील टाकळी, बोलवाड, सुभाषनगर, नरवाड, बिसूर, संतोषवाडी व विजयनगर या सात गावांचा पिण्याचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी भारत निर्माण योजना मंजूर करण्यात आल्या आहेत. मंजुरीनंतर वर्ष ते दीड वर्षात योजना पूर्ण करावयाच्या होत्या. वारंवार मुदतवाढ देऊनही त्या आठ वर्षात अपूर्णच आहेत. टाकळी, बोलवाड व सुभाषनगर येथील योजनेच्या पाण्याची चाचणी घेण्यात आली असली, तरी योजनेत समाविष्ट असलेल्या हुळ्ळे प्लॉटपर्यंतचे काम न झाल्याने हे काम अपूर्ण आहे. नरवाड येथे २ कोटी २० लाखांची योजना मंजूर आहे. या निधीतून केवळ जलवाहिन्या टाकण्याचे काम करण्यात आले आहे. योजनेची कागदपत्रे उपलब्ध नाहीत. बिसूर येथे मंजूर १७ लाख निधीपैकी दहा लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. सात लाख रुपये खर्चाचा हिशेबच उपलब्ध नाही. संतोषवाडी येथील योजनेचा समावेश असलेल्या वस्त्यांचे काम अपूर्ण आहे. विजयनगर येथील भारत निर्माण योजनेवर खर्च करण्यात आलेल्या खर्चाच्या हिशेबाची कागदपत्रे उपलब्ध नसल्याचे आढळून आले आहे. मुदतवाढ देऊनही भारत निर्माण योजनेचे काम वेळेत न करणे, दर्जाहीन कामे, निधीचा अपहार याची गांभीर्याने दखल घेऊन या योजनेचे अध्यक्ष, सचिव, ठेकेदार व तांत्रिक सल्लागार यांच्यावर फौजदारी दाखल करून त्यांच्या मालमत्तेवर बोजा चढविण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले असल्याचे नागरगोजे यांनी सांगितले. (वार्ताहर)आठवड्याभरात कारवाई होणारभारत निर्माण योजनेतील अनियमितता व हिशेबातील गोंधळ याची दखल घेऊन भारत निर्माण योजनेचे अध्यक्ष, सचिव, ठेकेदार व तांत्रिक सल्लागारांवर फौजदारी दाखल करण्याच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार आठवड्याभरात ही कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रभारी अभियंता नागरगोजे यांनी सांगितले.