शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

नगराध्यक्षपदी सुभाष सूर्यवंशी; उपनगराध्यक्षपदी संजय कोरे?

By admin | Updated: July 12, 2014 00:21 IST

इस्लामपूर पालिका : राष्ट्रवादीच्या हालचाली गतिमान

अशोक पाटील - इस्लामपूरविधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इस्लामपूरच्या नगराध्यक्षपदी सुभाष सूर्यवंशी, तर उपनगराध्यक्षपदी संजय कोरे यांची निवड होण्यासाठी ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांनी हिरवा कंदील दाखविल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. स्वीकृत नगरसेवकांमध्येही बदल होण्याची शक्यता आहे.नगराध्यक्षा अरुणादेवी पाटील यांचा अडीच वर्षाचा कार्यकाल संपुष्टात आला आहे. येणाऱ्या अडीच वर्षासाठी हे पद इतर मागास पुरुष प्रवर्गासाठी राखीव आहे. सुभाष सूर्यवंशी एकमेव दावेदार असल्याने त्यांनाच संधी मिळणार आहे, परंतु त्यांना हे पद मिळू नये म्हणून त्यांच्या विरोधी गटाने तक्रारी दाखल केल्या आहेत. तक्रारी अद्याप न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे सूर्यवंशींना नगराध्यक्षपदाची संधी मिळणार आहे. उपनगराध्यक्ष शंकर चव्हाण यांचीही मुदत संपल्याने या पदावर पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील गटातून पीरअली पुणेकर, तर एन. ए. गु्रपमधून संजय कोरे यांची नावे पुढे आली आहेत. महिलेला संधी देण्याचा विचार झाल्यास लता कुर्लेकर, नीलिमा कुशिरे यांच्या नावासाठी विजयभाऊ पाटील आग्रही राहतील, असे सांगण्यात येते.दि. २२ जुलैरोजी निवडी होण्याची शक्यता आहे. निवडीचा अंतिम निर्णय जयंत पाटील हेच घेणार आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर इस्लामपूर शहरातील राजकारणात पाटील यांनी थोडेसे दुर्लक्ष केले आहे. विधानसभा निवडणुकीला पालिकेतील फळी मजबूत करण्यासाठी सर्वच गटांना न्याय देण्याच्या भूमिकेतून या निवडी होणार आहेत. एन. ए. गु्रपचे ज्येष्ठ नगरसेवक संजय कोरे यांना उपनगराध्यक्षपदाची संधी दिल्यास पालिकेचा कारभार सुरळीत चालेल, असे सांगितले जाते. यामुळेच कोरे यांनाच उपनगराध्यक्ष पदाची संधी मिळण्याची शक्यता अधिक आहे. स्वीकृत नगरसेवकांमध्येही बदल होणार आहेत. शहाजीबापू पाटील, अ‍ॅड. संपत पाटील, सदानंद पाटील यांच्या जागांवर युवकांना संधी द्यावी, अशी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची मागणी आहे.