शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सुभाष देशमुख सांगलीचे पालकमंत्री

By admin | Updated: December 29, 2016 23:49 IST

चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्रिपद

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्याऐवजी महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्रिपद दिले आहे. त्याशिवाय पाटील यांच्याकडे कोल्हापूरचे पालकमंत्रिपद कायम राहील. सांगली जिल्ह्याचे पालकमंत्रिपद सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे, तर सातारा जिल्ह्याचे सहपालकमंत्रिपद सदाभाऊ खोत यांच्याकडे देण्यात आले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी पहिल्यांदाच सहपालकमंत्रिपद निर्माण केले आहे. ज्या दोन मंत्र्यांमध्ये जिल्ह्याच्या कारभाराबाबत संघर्ष घडू शकतो त्या दोघांचेही समाधान अशाप्रकारे मुख्यमंत्र्यांनी केले आहे.एकनाथ खडसे महसूलमंत्री असताना ते जळगाव आणि बुलडाणाचे पालकमंत्री होते. त्यांच्या राजीनाम्यानंतर या दोन्हींचे पालकमंत्रिपद मुख्यमंत्री फडणवीस यांनी फुंडकर यांच्याकडे दिले. फुंडकर हे खडसे यांचे निकटवर्ती मानले जातात. आता जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीच्या तोंडावर फुंडकर यांच्याकडून जळगावचे पालकमंत्रिपद काढण्यात आले आहे. जळगावच्या राजकारणात खडसे विरुद्ध जलसंपदामंत्री गिरीश महाजन या दोघांच्या संघर्षाचा फटका पक्षाला बसू नये आणि संघर्षाच्या प्रसंगात मध्यस्थी व्हावी यासाठी मुद्दाम चंद्रकांत पाटील यांना पालकमंत्रिपद दिल्याचे म्हटले जात आहे. परिवहनमंत्री दिवाकर रावते हे आतापर्यंत परभणीचे पालकमंत्री होते. आता त्यांना उस्मानाबादचे पालकमंत्रिपद देण्यात आले आहे. पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर हे उस्मानाबादचे सहपालकमंत्री असतील.गेल्या विस्तारात राज्यमंत्री झालेले भाजपचे मदन येरावार यांना यवतमाळचे पालकमंत्रिपद देण्यात आले असून तेथे आतापर्यत पालकमंत्री असलेले महसूल राज्यमंत्री शिवसेनेचे संजय राठोड यांना सहपालकमंत्रिपद देण्यात आले आहे. राठोड हे आता वाशिमचे पालकमंत्री असतील. तेथे येरावार आता त्यांच्याकडे अकोल्याचे पालकमंत्री पद कायम ठेवण्यात आले आहे. सातारामध्ये शिवसेनेचे राज्यमंत्री विजय शिवतारे पालकमंत्री आहेत. तेथे राज्यमंत्री आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांना सहपालक मंत्रीपद देण्यात आले आहे. सहकार मंत्री सुभाष देशमुख हे सांगलीचे पालकमंत्री असतील. राज्यमंत्री शिवसेनेचे गुलाबराव पाटील हे परभणीचे नवे पालकमंत्री असतील. आतापर्यंत हे पद दिवाकर रावते यांच्याकडे होते. (विशेष प्रतिनिधी)