शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकींच्या शोरूम्सना सांगलीत जत्रेचे स्वरूप

By admin | Updated: March 30, 2017 23:35 IST

बीएस-३ इंजिनच्या गाड्या खपविण्यासाठी धावाधाव : दिवसात पाचशेवर दुचाकींची विक्री

सांगली : सर्वोच्च न्यायालयाने बीएस-३ (भारत स्टेज-३) इंजिन प्रकारातील वाहनांवर १ एप्रिलपासून बंदी घातल्यामुळे नामांकित दुचाकी कंपन्यांनी त्यांच्याकडील बीएस-३ प्रकारातील सर्व वाहनांवर इतिहासातील सर्वात मोठ्या सवलतींचा वर्षाव केला. त्यामुळे सांगली, मिरजेतील अनेक शोरुम्स्मध्ये गुरुवारी ग्राहकांची जत्रा भरली. दिवसात पाचशेहून अधिक वाहनांचे बुकिंग झाले असून, शुक्रवारीही अशीच स्थिती राहण्याची चिन्हे आहेत. सांगली, मिरज शहरातील वाहनांवर मोठ्या सवलती जाहीर झाल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरली आणि शोरुम्समध्ये खरेदीसाठी लोक तुटून पडले. गर्दी इतकी वाढली की, शोरुम्समधील कर्मचाऱ्यांना गर्दी नियंत्रित करणे मुश्किल झाले. सांगलीतील मिलेनियम होंडा, पट्टणशेट्टी होंडा, पोरेज् टीव्हीएस, मिरजेतील सिद्धिविनायक या शोरुम्समध्ये सवलती सुरू झाल्यानंतर दिवसभर खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केली. मुहूर्तावर होणाऱ्या खरेदीचेही विक्रम गुरुवारी मोठ्या सवलतींच्या वर्षावाने मोडीत निघाले. दिवसभर शोरुम्सना जत्रेचे स्वरूप आले होते. वाहने मिळविण्यासाठी ग्राहकांची धडपड सुरू होती. हिरो मोटो कॉर्प आणि होंडा मोटारसायकल अ‍ॅण्ड स्कुटर इंडिया या दोन कंपन्यांनी सर्वात मोठ्या आॅफर्स जाहीर केल्या. कंपन्यांनी जाहीर केलेल्या आॅफर्समध्ये पुन्हा स्थानिक विक्रेत्यांनी स्वत:च्या आॅफरची भर घातली आणि वेगवेगळ्या सवलती जाहीर केल्या. त्यामुळे ग्राहक खरेदीसाठी तुटून पडले. सात हजार रुपयांपासून २0 हजार रुपयांपर्यंतच्या सवलती दुचाकी वाहनांवर होत्या. दिवसभरात मोपेड प्रकारातील बीएस-३ ची बहुतांश वाहने विकली गेली. मोटारसायकलचा साठा अजूनही शिल्लक आहे. काही शोरुम्सनी या वाहनांच्या माध्यमातून मोठा फटका बसू नये म्हणून वर्षाचा मोफत विम्यासह सेवेमध्ये काही सवलती जाहीर केल्या. सांगलीतील अन्य दुचाकी वाहन विक्रेत्यांनी कंपनीची आॅफर असूनही वाहनांची विक्री केली नाही. गेल्या महिन्याभरात बुकिंग झालेल्या वाहनांचे अजून पासिंग झाले नसल्याने, त्यांनी आॅफरने वाहन विक्री करणे टाळले. तरीही दिवसभर अशा शोरुम्समध्ये ग्राहकांची चौकशी सुरू होती. नेहमी साडेसहा वाजता बंद होणारी शोरुम्स ग्राहकांच्या गर्दीमुळे रात्री आठपर्यंत सुरू होती. (प्रतिनिधी)