शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाईन, ऑफलाईन वर्गांना वर्षभर अनुपस्थित विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:24 IST

सांगली : लॉकडाऊन काळात ऑनलाईन किंवा ऑफलाईन वर्गांना गैरहजर असणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश न देण्याचा निर्णय खासगी इंग्रजी ...

सांगली : लॉकडाऊन काळात ऑनलाईन किंवा ऑफलाईन वर्गांना गैरहजर असणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश न देण्याचा निर्णय खासगी इंग्रजी शाळांनी घेतला आहे. इंडिपेंडंट इंग्लिश स्कूल्स असोसिएशन (इसा) या संघटनेच्या राज्यभरातील ४ हजार २०० खासगी इंग्रजी शाळांनी हा निर्णय घेतला आहे. वर्गांना अनुपस्थित राहिल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, या हेतूने निर्णय घेतल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र दायमा यांनी दिली.

संघटनेने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, कोरोनामुळे राज्यातील शाळा गेल्या वर्षी १५ मार्चपासून बंद राहिल्या होत्या. जून-जुलैपासून ऑनलाईन शिक्षण सुरु झाले. त्यानंतर नोव्हेंबर - डिसेंबरपासून मर्यादीत विद्यार्थ्यांसह प्रत्यक्ष वर्ग सुरु झाले. राज्यभरात सुमारे १५ ते २० टक्के विद्यार्थी ऑनलाईन किंवा ऑफलाईन या दोन्ही माध्यमात शाळेच्या संपर्कात राहिले नाहीत. शिक्षणाच्या प्रवाहापासून दूरच राहिले. यातील अनेकांनी कोरोनामुळे स्थलांतर केले. स्थलांतराच्या प्रक्रियेत जुन्या शाळेपासून दुरावले, तसेच नव्या शाळेतही प्रवेश घेतला नाही.

अशा विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देणे म्हणजे त्यांचे न भरुन येणारे शैक्षणिक नुकसान करण्यासारखे आहे. अभ्यासक्रम पूर्ण न केल्याने कोणत्याही ज्ञानाशिवाय ते पुढील वर्गात जातील, त्यामुळे विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन इसा संघटनेने या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश न देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यभरातील ४ हजार २०० शाळा या निर्णयानुसार कार्यवाही करतील.

चौकट

अनेक पालकांनीही घेतला गॅप

गेल्या संपूर्ण वर्षभरात मुले फक्त ऑनलाईन शिक्षणावर अवलंबून राहिली. वर्ग प्रत्यक्ष सुरु झाले, तेव्हादेखील शंभर टक्के उपस्थिती लावता आली नाही. त्यामुळे अनेक पालकांनी आपल्या पाल्यासाठी यावर्षी गॅप घेण्याचा निर्णय घेतला आहे. अर्धवट ज्ञानासह वरच्या वर्गात जाण्यास त्यांचा विरोध आहे.