शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

‘फी’साठी विद्यार्थ्यांना शाळेतून हाकलले

By admin | Updated: February 10, 2016 01:08 IST

सांगलीतील घटना : संस्थापकावर गुन्हा दाखल

सांगली : अनुसूचित जातीच्या आरक्षणावर दोघा सख्ख्या भावांना प्रवेश मिळूनही त्यांच्या फीमध्ये सवलत न देता, फी भरली नसल्याच्या कारणावरुन त्यांना शाळेतून बाहेर काढून पालकांना दमदाटी केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी उघडकीस आला. जागृती शिक्षण संस्थेच्या विश्रामबाग येथील वारणालीतील सेंट्रल इंग्लिश स्कूलमध्ये हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी संस्थेचे संस्थापक बाळासाहेब जे. पाटील (रा. सांगली) यांच्याविद्ध संजयनगर पोलीस ठाण्यात जातीवाचक शिवीगाळ (अ‍ॅट्रॉसिटी) केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.विजयनगर येथील दीडशे फूट रस्त्यावर राहणारे संतोष वसंत भंडारे यांनी फिर्याद दिली आहे. त्यांना संकेत (वय १०) व दर्शन (८) ही दोन मुले आहेत. मुलांना त्यांनी अनुसूचित जातीच्या आरक्षणावर सेंट्रल इंग्लिश स्कूलमध्ये प्रवेश घेतला होता. संकेत चौथीत, तर दर्शन दुसरीत शिकतो. आरक्षणाच्या मुद्यावर भंडारे यांच्या दोन्ही मुलांना शाळेच्या फीमध्ये २५ टक्के सवलत मिळणार होती. तरीही संस्थेने त्यांना फीमध्ये सवलत दिली नाही. भंडारे यांनी संस्थेकडे माहितीच्या अधिकाराखाली अनुसूचित जातीच्या आरक्षणावर फीमध्ये किती टक्के सवलत दिली जाते? किती विद्यार्थ्यांना आरक्षणावर प्रवेश दिला आहे? माझ्या दोन्ही मुलांची अजून किती फी भरायची आहे? या तीन प्रश्नांवर माहिती मागविली होती. पण संस्थेने त्यांना कोणतीही माहिती दिली नाही. त्यानंतर फी भरली नाही, म्हणून त्यांच्या मुलांना शाळेतून बाहेर काढले होते. भंडारे यांनी यासंदर्भात शाळेकडे विचारणा केली, त्यावेळी शाळेने त्यांना जातीचा दाखला देण्याची मागणी केली. जातीचा दाखला दिल्यानंतर मुलांना पुन्हा शाळेत बसविले. आठवड्यापूर्वी भंडारे यांना संस्थेचे संस्थापक बाळासाहेब पाटील यांनी भंडारे यांना बोलावून घेतले. त्यांना एक अर्ज देऊन त्यावर सही करण्यास सांगितले. भंडारे यांनी अर्ज वाचल्यानंतर त्यामध्ये शासनाच्या अनुसूचित जातीच्या आरक्षणावर फीमध्ये सवलत घेतली असल्याचे म्हटले होते. भंडारे यांनी पाटील यांना ‘आम्हाला कोणतीही सवलत मिळाली नाही, त्यामुळे मी सही करणार नाही’, असे सांगितले. यावर पाटील यांनी, ‘तुमच्यासारख्या लोकांमुळे शाळेचा दर्जा खालावला आहे’, असे म्हणून जातीवाचक शिवीगाळ करुन, मुलांना शाळेतून घेऊन जा, असे सांगितले. (प्रतिनिधी)उपअधीक्षकांकडे तपासशासनाच्या सवलतींचा लाभ मिळत असतानाही संस्थेने विद्यार्थ्यांना दिला नाही. त्यानंतर पालकांना दमदाटी व विद्यार्थ्यांना शाळेतून बाहेर काढल्याचा प्रकार शहरात प्रथमच घडला आहे. पोलिसांनीही तातडीने गुन्हा दाखल करून घेतला. याचा तपास पोलीस उपअधीक्षकांकडे सोपविला जाणार आहे.