एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून १९९३ मध्ये शाखाप्रमुख म्हणून काम करण्यास आनंदराव पवार यांनी सुरुवात केली. त्यानंतर १९९६ मध्ये ते इस्लामपूरचे सेनेचे शहरप्रमुख बनले. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना तालुकाप्रमुख म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्याचवेळी ते नगरसेवक म्हणून मोठ्या मताधिक्याने निवडून आले. त्यांच्या कामाची आणि धडाडीची दखल राज्यपातळीवर घेण्यात आली. त्यामुळे त्यांना २००८ मध्ये जिल्हाप्रमुख म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर त्यांच्या कामाचा ते ताईत बनले. त्यांच्या कामामुळे ते २०११ मध्ये दुसऱ्यांदा उच्चांकी मताने निवडून आले. एकेकाळी वाळवा तालुका म्हणजे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. इस्लामपूर नगरपालिकेवर सलग ३१ वर्षे राष्ट्रवादीची सत्ता होती. मात्र या ठिकाणी त्यांच्या सत्तेला सुरुंग लावण्याचे काम आनंदराव पवार यांनी केले. पक्षातील वरिष्ठांकडे सतत पाठपुरावा करून अनेक कामे मार्गी लावली आहेत.
२०१६ मध्ये नगरपरिषदेमध्ये स्वत:सह पाच नगरसेवक पक्ष चिन्हावर उच्चांकी मताने विजयी, तर एक नगरसेवक बिनविरोध. राष्ट्रवादीच्या ३१ वर्षे ताब्यात असलेली एकहाती सत्ता काबीज केली.
विविध आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी जिल्ह्यात वेगळी छाप पाडली आहे. इस्लामपूर नगरपरिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावर विजय खेचून आणला. या विजयामुळे बापूंच्या कामगिरीची दखल पक्षपातळीवर घेण्यात आली.
थेट स्वभाव आणि दोस्तीसाठी संकटे झेलणारे दिलदार व्यक्तिमत्त्व आहे. सदैव पक्षाच्या वाढीसाठी कार्यरत असणाऱ्या बापूंची प्रसिध्दीपासून अलिप्त राहण्याची खासियत आढळते. विश्वासू कार्यकर्त्यांच्या आंदोलनाला ताकद देण्याचा सातत्याने त्यांचा प्रयत्न असतो. जिल्ह्याच्या पश्चिम भागात शिवसेना म्हटले की, आनंदाबापू असे शब्द सहजच ओठावर उमटतात.
भारनियमन, महागाई याविरोधात पक्षाच्या ध्येयधोरणानुसार शिवसेना स्टाईल आंदोलनामुळे त्यांची कारकीर्द उल्लेखनीय ठरत आहे. उरुणसारख्या छोट्या परिसरातून बापूंच्या सामाजिक कामाची सुरुवात झाली आहे. ही सुरुवात शिवसैनिक, शहरप्रमुख, तालुकाप्रमुख ते जिल्हाप्रमुखपर्यंत पोहोचली आहे. शिवसेनेत सामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळतो, हा आत्मविश्वास कार्यकर्त्यांत असतो. याच बळावर बापूंची कामगिरी सातत्याने चढत्या क्रमाने सुरू आहे. क्रांतिभूमी वाळवा तालुक्याला इतिहास आहे. या भूमितील आक्रमक विचारांचा वारसा चालवणाऱ्या व प्रस्थापितांच्याविरोधात भूमिका घेणारे बापू पक्षाच्या धोरणाला साजेसी भूमिका घेतात.
कोरोना काळात पूर्ण प्रभागातील नागरिकांना वाफेची मशिन्स तसेच इस्लामपूर शहरातील उपजिल्हा रुग्णालय, इस्लामपूर मल्टिस्पेशालिटी रुग्णालय, आधार रुग्णालय येथे युवासेना प्रमुख, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे व खासदार धैर्यशील माने यांच्या माध्यमातून लाखो रुपये किमतीची व्हेंटिलेटर दिली. कोरोना काळात रुग्णालयात रुग्णांना व नातेवाईकांना मोफत जेवण पोहोच केले. यामुळे संकटात सर्वसामान्य नागरिकांसाठी धाऊन जाणारा आपला माणूस अशी त्यांची प्रतिमा निर्माण झाली आहे.
शिवसेनेचे पदाधिकारी म्हणून धुरा सांभाळत असताना सर्वच क्षेत्रातील मान्यवरांशी त्यांचे मित्रत्वाचे संबंध आहेत. सर्वसामान्य कुटुंबातील युवक नेत्याची वाटचाल अभिमानास्पद आहे. या वाटचालीला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा आशीर्वाद तसेच जिल्ह्यासह राज्यातील अनेक ज्येष्ठ पदाधिकारी, सहकारी व सच्चा शिवसैनिकांची साथ ही खरी आनंदाबापूंच्या कार्याची पोहोच आहे. सातत्याने संघर्ष करणाऱ्या झुंजार, निष्ठावंत शिवसैनिकाला वाढदिवसाच्या लाख-लाख शुभेच्छा..!
चाैकट
नाव : उदय ऊर्फ आनंदराव रामचंद्र पवार
शिक्षण : १२ वी
व्यवसाय : शेती व समाजकार्य
संपर्क नं. : मो. ९०११५५३३३३, कार्यालय : मो. ७०३०६२३३३३, निवास (०२३४२) २२३५५५
राजकीय वाटचाल :
११९३ : पासून शिवसेना पक्षात शिवसैनिक म्हणून कार्यरत, शिवसैनिक ते शाखाप्रमुख म्हणून शहरातील विविध प्रश्नांवर आंदोलने केली.
११९६: मध्ये शहरप्रमुख म्हणून निवड
तत्कालीन युती शासनाच्या काळात जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील
२००६: १९९६ ते २००६ शहरप्रमुख म्हणून कार्यरत राहिल्यानंतर पक्ष नेतृत्वाने तालुकाप्रमुख पदाची जबाबदारी दिली. तसेच राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या इस्लामपूर नगरपरिषदेमध्ये धनुष्यबाण चिन्हावर उच्चांकी मताने प्रवेश करून नगरसेवकपदी विराजमान तालुकाभर शिवसेनेचा भगवा झंजावात केला.
२००८ : नगरसेवक पदाची यशस्वी कारकीर्द व तालुकाप्रमुख म्हणून उल्लेखनीय कामाची दखल घेत पक्षाने शिवसेना सांगली जिल्हाप्रमुख म्हणून जबाबदारी दिली. ऊसदर, दूध प्रश्नावर तसेच इतर प्रश्नांवर शासनाला धारेवर धरत आंदोलने केली.
२०११ : दुसऱ्यांदा पक्ष चिन्हावर नगरसेवक म्हणून विजयी. जिल्ह्यातील जनतेच्या विविध प्रश्नांवर आंदोलने केली व जनतेला न्याय देण्यासाठी प्रयत्नशील.
२०१३ ते आजअखेर: २०१३ मध्ये परत पक्ष नेतृत्वाने जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी दिली. २०१४ महायुतीच्या झेंड्याखाली एकत्र येत. यशस्वीपणे काम करत २०१६ मध्ये नगरपरिषदेमध्ये स्वत:सह ५ नगरसेवक पक्ष चिन्हावर उच्चांकी मताने विजयी, तर १ नगरसेवक बिनविरोध, राष्ट्रवादीच्या ३१ वर्षे ताब्यात असणारी एकहाती सत्ता काबीज केली. पक्षाचा विचार घरोघरी पोहोचवण्याचे काम करत आहे.