शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
3
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
4
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
5
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
7
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
8
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
9
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
10
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
11
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
12
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
13
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
14
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
15
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
16
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
17
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
18
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
19
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
20
भाडेकरार, भाडेवाढीशिवाय घरे रिकामी करणार नाही; नायगाव बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडाला कडक इशारा

बहुजनांची लोककला संपविण्याचा डाव

By admin | Updated: June 30, 2015 00:21 IST

भारत पाटणकर : कवठेमहांकाळमध्ये महोत्सव

कवठेमहांकाळ : बहुजनांची लोककला संपविण्याचा विडा ब्राह्मणी व्यवस्थेने उचलला आहे. आता माणसे मारून आपली संस्कृती लादली जात आहे. हिसेंच्या विरोधात भीतीची संस्कृती संपविल्याशिवाय मुक्तीची गाणी गाण्यासाठी लोक पुढे येणार नाहीत. या चळवळीत अधिकाधिक कार्यकर्ते सहभागी व्हावेत. चळवळ अधिक सक्षम करण्यासाठी प्रा. दादासाहेब ढेरे यांनी योगदान द्यावे, असे आवाहन ज्येष्ठ विचारवंत डॉ. भारत पाटणकर यांनी केले.येथील राजर्षी शाहू विचार मंचतर्फे रविवारी आयोजित राजर्षी शाहू लोककला महोत्सव आणि प्रा. दादासाहेब ढेरे यांचा सत्कार, गौरव ग्रंथ प्रकाशन कार्यक्रमात डॉ. पाटणकर बोलत होते. ज्येष्ठ विचारवंत प्रा. बाबूराव गुरव अध्यक्षस्थानी होते.डॉ. पाटणकर म्हणाले की, मोठे म्हणवून घेणारे संगीतकार आदिवासींच्या तांड्यापर्यंत गेले. तेथील चाली अणि रचना त्यांनी आणल्या. त्यामुळे ते मोठे झाले. दाभोलकर आणि पानसरेंचे मारेकरी सनातनी आहेत, यावर शिक्कामोर्तब झाले आहे; मात्र सरकार कारवाई करत नाही. सरकारवर दबाव आणण्यासाठी आता पुरोगाम्यांनी एक होऊन संघर्ष उभा केला पाहिजे. प्रा. दादासाहेब ढेरे यांचे कवठेमहांकाळच्या सामाजिक आणि पुरोगामी चळवळीतील योगदान मोलाचे आहे. भविष्यात त्यांनी पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून काम करावे.आमदार सुमनताई पाटील म्हणाल्या की, प्रा. ढेरे यांनी आर. आर. आबांच्या बरोबरीने काम केले. आबांच्या आणि पुरोगामी विचारांची मशाल त्यांनी तेवत ठेवली आहे.विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे अध्यक्ष पार्थ पोळके म्हणाले, डावी चळवळ कोणा जातीच्या विरोधात नाही. आमच्या पिढ्या ज्यांनी गारद केल्या, त्यांच्याशी ही लढाई आहे. आता न्याय, समतेच्या लढाईसाठी बहुजनांनी रस्त्यावर उतरावे. प्रा. दादासाहेब ढेरे म्हणाले, आता पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून बहुजनांच्या हक्कासाठी, न्याय, समतेसाठी रस्त्यावर उतरण्याची भूमिका घेतली जाईल.यावेळी प्राचार्य विश्वास सायनाकर, महांकाली कारखान्याचे अध्यक्ष विजय सगरे, बाबासाहेब वडगावकर यांचीही भाषणे झाली. डॉ. शिवपुत्र कोरे, प्रा. डॉ. सुवर्णा मोरे, प्रा. डॉ. मंगल लोंढे, दिग्विजय ढेरे आदी २१ गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. एकदिवसीय राजर्षी शाहू लोककला महोत्सव पार पडला. यामध्ये एल्गार कला मंच मुंबई, सांगलीचे लोकजागर कला मंच आणि कवठेमहांकाळ येथील गाणी बुद्ध भीमाची या पथकांनी ‘जलसा मानव मुक्तीचा’ हा शाहिरी आणि लोकगीतांचा कार्यक्रम सादर केला. स्वागताध्यक्ष हायूम सावनूरकर यांनी प्रास्ताविक केले. बाळासाहेब रास्ते यांनी आभार मानले. सुरेशभाऊ पाटील, गजानन कोठावळे, माधवराव माने, गणपती सगरे, चंद्रकांत हाके, वैशाली पाटील, बाळासाहेब गुरव, दत्ताजीराव पाटील, बाळासाहेब कोठावळे, शिवाजी चंदनशिवे, दादासाहेब कोळेकर उपस्थित होते. अनिल म्हमाणे, बाळासाहेब रास्ते, रा. बा. सपकाळ, मुबारक मुल्ला आदींनी संयोजन केले. (वार्ताहर)