शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बदलत्या समीकरणांच्या बोरगावात तगडे इच्छुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बोरगाव : राजकीयदृष्ट्या संवेदनशील बोरगाव (ता. वाळवा) येथील राजकीय समीकरणे कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीत नेहमी बदलत राहतात. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

बोरगाव : राजकीयदृष्ट्या संवेदनशील बोरगाव (ता. वाळवा) येथील राजकीय समीकरणे कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीत नेहमी बदलत राहतात. गावातील काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादीचा संघर्ष व्यक्तिसापेक्ष बदलतो, कारण येथील नेत्यांचा भूमिका नेहमीच वेगवेगळ्या असतात. यंदाही येथून तगडे इच्छुक पुढे आले आहेत.

गावात कृष्णा कारखान्यातील चार गट अस्तित्वात आहेत. सत्ताधारी भोसले गट, अविनाश मोहिते गट, इंद्रजित मोहिते गट व मदनराव मोहिते गट यात येथील सभासद व नेत्यांची विभागणी होते. अलीकडे मात्र मदनराव मोहिते गटाचे अस्तित्व दिसत नाही. या निवडणुकीत येथील इंद्रजित मोहिते गटही ‘बॅकफूट’वर गेला आहे. कारण या गटाचे हुकमी एक्का मानसिंग ऊर्फ बाळनाना पाटील आर्थिक घोटाळ्यात कारागृहात आहेत.

बोरगावचे मतदान ७३५, तर बोरगावखालील पाच वाड्यांचे मतदान ५०५ असे एकूण मतदान १,२४० आहे. त्यामुळे या गावचा उमेदवार रिंगणात असतोच. यावेळी भोसले यांच्या सहकार पॅनलकडून विद्यमान संचालक व जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र पाटील इच्छुक आहेत. त्यांच्या कुटुंबात तीन पिढ्यांपासून ‘कृष्णा’चे संचालकपद आहे. अविनाश मोहितेंच्या संस्थापक पॅनलकडून राजारामबापू सूतगिरणीचे संचालक व ‘कृष्णे’चे माजी संचालक उदयसिंह शिंदे आणि बाजार समितीचे संचालक मानाजी पाटील, पोल्टी व्यावसायिक जगन्नाथ पाटील इच्छुक आहेत. इंद्रजित मोहितेंच्या रयत पॅनलकडून माजी उपसरपंच पैलवान विकास पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. उमेदवारी कोणाला दिली जाणार व हा सामना दुरंगी होणार की तिरंगी, यावर या गावातील समीकरणे अवलंबून आहेत.