शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

कणखर नेतृत्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:20 IST

कार्यकर्त्यावर एकदा विश्वास ठेवला की त्यात तसूभरही कमतरता होणार नाही, याची काळजी आमदार मानसिंगराव नाईक हे नेहमीच घेत आले ...

कार्यकर्त्यावर एकदा विश्वास ठेवला की त्यात तसूभरही कमतरता होणार नाही, याची काळजी आमदार मानसिंगराव नाईक हे नेहमीच घेत आले आहेत. ते कार्यकर्त्याना वेळाेवेळी बळ देतात. अनेक वर्षे ते शिराळा व वाळवा मतदारसंघाचे नेतृत्व करत आहेत. त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या प्रत्येक पंचवार्षिकमध्ये वाढतच जात आहे.

आपल्या राजकीय कारकिर्दीमध्ये त्यांनी जिवाभावाचे कार्यकर्ते निर्माण केले. कार्यकर्त्यांवर ते जिवापाड प्रेम करतात. सामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळाला पाहिजे, यासाठी त्यांचा आग्रह असतो. त्यामुळेच त्यांच्याकडे सक्षम कार्यकर्त्यांची फळी आहे. निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या बळावर त्यांनी जिल्ह्याच्या राजकारणात एक दबदबा निर्माण केला आहे. दिलेला शब्द पाळणारे नेते म्हणून त्यांची ओळख आहे. माझ्या कार्यकर्त्याला कसे बळ मिळेल, त्याचा मान-सन्मान कसा वाढेल, त्याचबरोबर सामान्य माणसांच्या जीवनात काहीतरी चांगले घडावे आणि ते आपण घडवावे, यासाठी ते सदैव प्रयत्नशील असतात. २०१९ च्या निवडणुकीत आमदार म्हणून जनतेने त्यांना दुसऱ्यांदा संधी दिली. दरम्यान, विरोधकांना थोपवून धरत, प्रसंगी त्यांच्यावर मात करून भाऊंनी पक्ष बळकट केला. पक्षावर त्यांनी निष्ठा ठेवून काम केले. पक्षासंदर्भात अशी निष्ठा बाळगून त्यांना काय मिळाले? हा प्रश्न अनेकांच्या मनात येतो.

आमदार मानसिंगराव नाईक यांचे कार्यकर्ते नेहमीच त्यांच्या निष्ठेचे दाखले देत असतात. मात्र राजकारणात संयम महत्त्वाचा असतो. त्यांनी अनेक वेळा संयम बाळगल्याने निष्ठावंतांच्या यादीत त्यांचे स्थान अग्रभागी आहे. समाजकारण आणि राजकारणातील चारित्र्यसंपन्न नेता म्हणून त्यांच्याकडे बघितले जाते. त्यांनी तालुक्यामध्ये विश्वास उद्योग समूह, विराज उद्योग समूह अशा संस्था उभारून शेतकरी आणि तरुणांसाठी राेजगाराच्या माध्यमातून आर्थिक पाठबळ दिले. संस्था कशा असाव्यात, याचे आदर्श उदाहरण म्हणून या संस्थांचा उल्लेख होतो.

सत्तेचे पाठबळ असो अगर नसो; आपल्या विचार व कृतीवर ठामपणे उभे राहणाऱ्या या नेत्याने राजकारणातील साधनशुचितेला प्राधान्य दिले. कधीही विचारांशी तडजोड केली नाही किंवा कुणाशी अभद्र युतीही केली नाही.

त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील हे वैशिष्ट्य त्यांना इतर राजकारण्यांपासून वेगळे बनविते. आपल्या विचारांशी अशी बांधिलकी जपणारा राजकारणी आजच्या राजकारणात अभावानेच आढळतो. उभे आयुष्य सामान्य माणसाला उभे करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या या कणखर नेतृत्वाला परमेश्वर निरोगी, दीर्घायुष्य देवो! वाढदिवसाच्या त्यांना हार्दिक शुभेच्छा..!

------------------------— शंकर वसंत मोहिते

(खोतवाडी-सोनवडे)