कवठेमहांकाळ : गांधी एज्युकेशन सोसायटीच्यावतीने माध्यमिक शिक्षणाबरोबरच प्राथमिक शिक्षणाची सोय केली आहे. बहुजनांच्या मुलांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही आमदार अरुण लाड यांनी दिली.
कवठेमहांकाळ तालुक्यातील करोली (टी) येथील शहीद सुरेश चव्हाण हायस्कूल परिसरात सुरू करण्यात आलेल्या क्रांतिवीरांगणा विजयाताई लाड प्राथमिक विद्यानिकेतनच्या इमारतीच्या भूमिपूजनप्रसंगी आमदार लाड बोलत होते.
आमदार लाड, आमदार सुमनताई पाटील, महांकाली साखर कारखान्याच्या अध्यक्षा अनिता सगरे यांच्याहस्ते भूमिपूजन करण्यात आले. याप्रसंगी गांधी एज्युकेशन संस्थेचे सचिव प्रकाश लाड, उपाध्यक्ष व्ही. वाय. पाटील, सहसचिव सी. एल. रोकडे, किरण लाड, राजर्षी शाहू विचार मंचचे संस्थापक अध्यक्ष प्रा. दादासाहेब ढेरे, सरपंच आशिका पवार, एकनाथ जगताप, जनता शिक्षण संस्थेचे अशोक जाधव, बाळासाहेब गुरव, सी. वाय. जाधव, श्री. शिवाजी हायस्कूलचे मुख्याध्यापक एस. व्ही. पाटील, अरुण सावंत, ज्येष्ठ नेते भानुदास पाटील, प्रा. जी. ए. मुजावर, गिरीश शेजाळ, काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष अविराजे शिंदे उपस्थित होते.
पी. एस. गुरव यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, तर राजेंद्र भारती यांनी आभार मानले.