शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमादरम्यान झाला गोळीबार  
3
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
4
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
5
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
6
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
7
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
8
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
9
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
10
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
11
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
12
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
13
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
14
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
15
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
16
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
17
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
18
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
19
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
20
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता

अडचणींना चितपट करून सातासमुद्रापार झेप...-राष्ट्रीय क्रीडा दिन विशेष

By admin | Updated: August 28, 2014 23:04 IST

जिद्दी प्रवास : आरेवाडीच्या प्रकाश कोळेकरची युथ आॅलिम्पिकसाठी निवड

आदित्यराज घोरपडे - हरिपूर-प्रचंड मेहनत, सतत सराव आणि जिद्दीच्या जोरावर आरेवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथील एका मल्लाने थेट आॅलिम्पिकपर्यंत धडक मारली आहे. अडचणींना चितपट करून आॅलिम्पिकचे तिकीट फायनल करणाऱ्या त्या मल्लाचं नाव आहे ‘प्रकाश वसंत कोळेकर’. २९ आॅगस्ट : राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त प्रकाशच्या ‘आरेवाडी ते चीन’ या थरारक प्रवासाचा घेतलेला हा आढावा. कोरडवाहू शेती, मेंढरं राखणारे वडील आणि बिकट आर्थिक परिस्थिती हे प्रकाशच्या घरचं स्थिरचित्र. माणसाच्या मनात जिद्दीची मशाल पेटली, तर माणूस कोठून कुठे जातो, हे प्रकाशने सिध्द करून दाखवलं आहे. कुस्तीतील ४६ किलो वजनी गटातील ‘चपळ चित्ता’ ही प्रकाशची पक्की ओळख. २००७ पासून तो कुस्ती खेळू लागला. त्याच्या वडिलांना कुस्तीचा भारी नाद. त्यांनी प्रकाशला आटपाडीच्या वीर हनुमान कुस्ती केंद्रात घातलं. पोरानं परिस्थितीची जाण ठेवली. रात्रीचा दिवस केला, घाम गाळून लाल मातीचा चिखल केला. फक्त आरेवाडीचंच नाही, पुऱ्या महाराष्ट्राचं नाव या पोरानं चमकवलं. नानझीन (चीन) इथे होणाऱ्या युथ आॅलिम्पिक स्पर्धेसाठी प्रकाशची भारतीय संघात निवड झाली आहे. भारतीय कुस्ती महासंघ व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद यांनी त्याला निवडीचे पत्र दिले आहे. दर चार वर्षांनी ही स्पर्धा होते. भारंदाज आणि निकाल या डावांवर हुकूमत असणारा प्रकाश प्रतिस्पर्धी मल्लावर चपळ चित्त्याप्रमाणे तुटून पडतो. त्याने आजवर दोन राष्ट्रीय, एक आशियाई व एक जागतिक स्पर्धा खेळली आहे. शिवछत्रपती पुरस्कार विजेते मल्ल नामदेव बडरे (आटपाडी) हे प्रकाशचे गुरू. फक्त प्रकाशच नव्हे, तर प्रकाशसारख्या पाच-सहा मल्लांना त्यांनी पदरमोड करून घडवलं आहे. नुकत्याच स्लोव्हाकियात झालेल्या जागतिक स्पर्धेत प्रकाशनं पोलंड, कझाकिस्तान व रशियाच्या मल्लांना नमवत आगेकूच केली होती. तो रोज सहा तास सराव करतो. गुणवत्तेच्या जोरावर अनेक स्पर्धांसाठी प्रकाशची निवड होते, मात्र आर्थिक चणचणीमुळे त्याच्या स्पर्धा हुकतात. जिल्हा तालीम संघाने प्रकाशला मदत म्हणून अकरा हजारचा धनादेश दिला.

शासन व लोकप्रतिनिधींकडून अशा गुणवंत मल्लांना वेळीच मदत मिळाली तर कुस्तीचं गतवैभव परत येईल. युथ आॅलिम्पिकसाठी निवड झालेला प्रकाश हा महाराष्ट्रातील एकमेव मल्ल आहे. त्याच्या घरची परिस्थिती बेताची आहे. त्याचजिद्द हीच त्याची एनर्जी आहे. त्याच्याकडून खूप सराव करून घेतला आहे. आॅलिम्पिकमध्ये पदक मिळवणे हेच आमचे ध्येय आहे. शासनाने अशा होतकरू मल्लांना मदत करावी. - नामदेव बडरे, कुस्ती प्रशिक्षकप्रकाशने खेळलेल्या स्पर्धा२०१२ : राष्ट्रीय स्पर्धा : नालागढ (हिमाचल प्रदेश) : कांस्यपदक२०१३ : राष्ट्रीय स्पर्धा : कन्याकुमारी (तमिळनाडू) : सुवर्णपदक २०१३ : आशियाई स्पर्धा : उलानबटार (मंगोलिया) : पाचवा२०१४ : राष्ट्रीय स्पर्धा : श्रीनगर (जम्मू-काश्मीर) : सुवर्णपदक२०१४ : जागतिक स्पर्धा : स्लोव्हाकिया : चौथा२०१४ : नवी मुंबई महापौर केसरी२०१३ व १४ : कुमार कामगार केसरी