सांगली : नव्या शैक्षणिक धोरणामध्ये संविधानातील मूळ तत्त्वांना हरताळ फासला जाण्याचा धोका आहे, असे मत डॉ. माया नारकर यांनी व्यक्त केले.
येथील मैत्र प्रतिष्ठानच्या वतीने जागतिक पुस्तक दिन व प्रा. चारुदत्त भागवत यांच्या जन्मदिनानिमित्त नारकर यांचे ‘नवे शैक्षणिक धोरण’ या विषयावर व्याख्यान पार पडले. डॉ. माया नारकर यांनी नव्या शैक्षणिक धोरणातील विविध बाजूंचा आढावा घेतला आणि आकडेवारीसहीत अनेक बाजू स्पष्ट केल्या. या धोरणामध्ये संविधानातील मूळ मूल्ये, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यांनाच हरताळ फासला जाण्याचा धोका त्यांनी व्यक्त केला. तसेच सांस्कृतिक वर्चस्ववादाची भीती व्यक्त केली. स्वागत व प्रास्ताविक डॉ. माधुरी देशमुख यांनी केले. आभार नितीन पाटील यांनी मानले. कार्यक्रमाला प्रा. कल्पना भागवत, प्रा. अविनाश सप्रे, कणाद भागवत, श्रीया भागवत, प्रा. बी. एम. सरगर, उमेश देशमुख आदी सहभागी झाले होते.