शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

नववर्षाच्या पूर्वसंध्येला तीन कुटुंबांच्या स्वप्नांचा चुराडा

By admin | Updated: January 1, 2017 23:08 IST

दुर्दैवी अपघातामुळे हळहळ : तिघा जीवलग मित्रांनी गमावले हकनाक जीव

इस्लामपूर : नव्या वर्षातील नव्या अकांक्षा, नवी स्वप्ने, नवे संकल्प साकार करण्याचं वय. मात्र या मनांना जबाबदारीचं भान ओळखता न आल्याने दुचाकीवरील वेगाने बेभान झालेल्या तिघा युवकांना हकनाक आपले प्राण गमवावे लागल्याची दुर्दैवी घटना ३ कुटुंबांच्या स्वप्नांचा चुराडा करून केली. नववर्षाच्या पूर्वसंध्येला इस्लामपूर-राजारामनगर रस्त्यावर शनिवारी रात्री हा भीषण अपघात सर्वांच्या काळजाचा थरकाप उडवणारा ठरला.गौरेश शिवाजी देशमुख (वय १६), प्रशांत प्रकाश नायकवडी (१८, दोघे रा. कापूसखेड, ता. वाळवा) व विठ्ठल सुभाष कुटे (१७ रा. लोणार गल्ली इस्लामपूर) अशी तिघा मृतांची नावे आहेत. तिघेही कष्टकरी कुटुंबातील असल्याने या घटनेचा मोठा धक्का त्यांच्या नातेवाईकांना बसला आहे. ३१ डिसेंबरच्या रात्री बाहेर पडलेल्या तिघांना काळाने मृत्यूच्या दाढेत ढकलले अन् तिन्ही कुटुंबांच्या अंगणात नववर्षाच्या नव्या इच्छा, आकाक्षांची सुखक किरणे पडण्याऐवजी दु:खाचा काळा डोंगर उभा राहिला.या अपघातामधील प्रशांत नायकवडी हा इस्लामपूरच्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात कला शाखेच्या पदवीच्या प्रथम वर्षाचे शिक्षण घेत होता. महाविद्यालयात ये-जा करण्यासाठी याला कुटुंबियांनी दुचाकी (एमएच १० बीएस ५८६४) घेऊन दिली होती. शनिवारी रात्री सात वाजण्याच्या सुमारास प्रशांत आणि त्याचा गावातीलच मित्र गौरेश हे दोघे इस्लामपूरला आले. गौरेश हा परिसरातील वाहन पेंटिंग व्यवसायातील प्रसिध्द शिवाजी देशमुख यांचा मुलगा आहे. तेही कुटुंब कष्टकरी आहे, तर विठ्ठल कुटे हा मूळचा कवठेमहांकाळ परिसरातील असून, येथे लोणार गल्लीतील नातेवाईकांकडे आपल्या आई- वडिलांसह वास्तव्यास होता. सहा महिन्यांपूर्वीच त्याच्या बहिणीचे लग्न झाले होते; तर विठ्ठल हा एकुलता होता. त्याचे वडील खासगी वाहनावर चालक म्हणून काम करतात, तर विठ्ठल हा येथील एका लॉजवर व्यवस्थापक म्हणून काम करत होता.प्रशांत व गौरेशची विठ्ठलशी भेट झाल्यावर तिघेही प्रशांतच्या दुचाकीवरुन राजारामबापू कारखाना रस्त्यावरून निघाले. निनाईनगर परिसरात असताना समोरील ट्रकला ओलांडून जाण्याच्या प्रयत्नात हे तिघेही ट्रकची धडक बसून पाठीमागील चाकात सापडले आणि बघता बघता ५० फूट अंतरापर्यंत फरफटत जाऊन मृत्यूच्या दारी अधीन होऊन बसले. (वार्ताहर)ट्रकचा माग काढण्याचा प्रयत्नया अपघाताबाबत महेश शिवाजी पाटील (वय ३०, रा. कापूसखेड) यांनी पोलिसांत वर्दी दिली आहे. या अपघातातील अपघातग्रस्त ट्रक व चालकाने पलायन केले आहे. परिसरातील खासगी वसतिगृहाच्या सी. सी. टी. व्ही. फुटेजवरून पोलिस या ट्रकचा माग काढत आहेत.