शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत कडकडीत बंद, रस्ते ओस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:22 IST

फोटो : ०८शीतल०२ ते ०५ लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या ‘भारत बंद’ला मंगळवारी सांगली शहरातही उत्स्फूर्त ...

फोटो : ०८शीतल०२ ते ०५

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या ‘भारत बंद’ला मंगळवारी सांगली शहरातही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळी दहा वाजता उघडणारी दुकाने पूर्णपणे बंद होती. काही मोजक्याच दुकानदारांनी व्यवहार सुरू केले होते; पण नंतर तेही बंद करण्यात आले. मुख्य बाजारपेठेसह सर्वत्र शुकशुकाट दिसून आला.

केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात शेतकरी संघटनांनी भारत बंदचे आवाहन केले होते. या बंदला शहरातील काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेसह विविध सामाजिक संघटनांनीही पाठिंबा दिला होता. या बंदला शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बहुतांश व्यापाऱ्यांनीही दुकाने बंद ठेवली होती. कापडपेठ, मेन रोड, हरभट रोड, गणपती पेठ, मारुती रोड या परिसरातील व्यवहार बंद होते. त्यातूनही सकाळच्या टप्प्यात काही दुकानदारांनी दुकाने उघडली होती; पण शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची रॅली येताच त्यांनीही दुकाने बंद केली. काही ठिकाणी मात्र दुकानदार व आंदोलकांत बाचाबाचीही झाली.

मुख्य बाजारपेठेसह मार्केट यार्ड, राममंदिर, वखार भाग परिसरातील व्यवहार बंद होते. शहरातील औषध दुकाने, दूध केंद्र वगळता इतरांनी बंदला पाठिंबा दिला होता. जनसेवा भाजी विक्रेता संघानेही बंदमध्ये सहभाग घेतला होता. त्यामुळे शहरातील मंगळवारचे सर्वच बाजार बंद करण्यात आले होते. शिवाजी मंडईत काही विक्रेते भाजीपाला विक्रीसाठी आले होते. पण थोड्या वेळाने त्यांनीही गाशा गुंडाळला. हाॅटेल व्यावसायिक, पानपट्टीचालकांनीही बंदमध्ये भाग घेत व्यवसाय बंद ठेवले होते. त्यामुळे शहरातील सर्वच रस्ते ओस पडले होते.

चौकट

कोल्हापूर मार्गावरील वाहतूक बंद

जिल्ह्यातील एसटीची वाहतूक सुरू होती. शहरातही सिटी बसेस फिरत होत्या; पण कोल्हापूर, इचलकरंजी, जयसिंगपूर या मार्गावरील वाहतूक सकाळी दहानंतर एसटी महामंडळाने थांबविली होती. लांबपल्ल्याच्या बसेसही सुरू होत्या.