शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

कडक निर्बंधांचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:29 IST

सांगली : कोरोनाबाधितांच्या संख्येत होत असलेली वाढ ताण वाढविणारी असली, तरी प्रशासनाने सर्व नियोजन केले आहे. संसर्ग वाढू नये ...

सांगली : कोरोनाबाधितांच्या संख्येत होत असलेली वाढ ताण वाढविणारी असली, तरी प्रशासनाने सर्व नियोजन केले आहे. संसर्ग वाढू नये यासाठीच कडक निर्बंध लागू केले आहेत. राज्य शासनाच्यावतीने दिलेल्या सूचनांचे पालन करताना त्यामुळे काही घटकांना त्रास होत असला, तरी जनतेच्या सुरक्षेसाठीच कडक निर्बंधाची अंमलबजावणी जिल्ह्यात सुरू आहे. त्यामुळे त्यास विरोध करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी पत्रकार बैठकीत केले.

जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने केलेल्या नियाेजनाची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

डॉ. चौधरी म्हणाले, कोरोनाचा वाढत्या संसर्गामुळे लागू करण्यात आलेल्या निर्बंधामुळे रुग्णसंख्या कमी होण्याबरोबरच कोरोनाची साखळी तुटण्यास मदत होणार आहे. मात्र, व्यापाऱ्यांसह इतर घटकांना त्याची झळ बसत आहे. व्यवसाय सुरू करण्याबाबतच्या मागण्यांबाबत शासनाला कळविण्यात येईल; पण तोवर व्यापाऱ्यांनी नियमांचे उल्लंघन करू नये. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या प्रयत्नाला समाजातील प्रत्येक घटकाने सहकार्य द्यावे. लागू करण्यात आलेले निर्बंध शिथिल करण्याचे अथवा रद्द करण्याचे कोणतेही अधिकार प्रशासनाकडे नाहीत. शासनाच्या निर्णयांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्यामुळे कोणीही गैरसमज करून न घेता प्रशासनास सहकार्य करावे.

जिल्ह्यात कोरोना उपचारासाठी लागणाऱ्या रेमडेसिवीरसह इतर औषधांचा मुबलक साठा असून, आता तालुका पातळीवरही ऑक्सिजनची सुविधा असलेले कोविड सेंटर्स उपचारासाठी सुरू करण्यात आली आहेत. त्यामुळे रुग्णांवर अधिक प्रभावी उपचार होणार असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

चौकट

होम आयसोलेशनचे उल्लंघन नको

होम आयसोलेशनमध्ये उपचार घेणारा रुग्ण बाहेर फिरला, तर त्याच्यापासून संसर्गाची शक्यता वाढते. त्यामुळे होम आयसोलेशनमध्ये असणाऱ्या रूग्णांनी नियमांचे पालन करावे. पोलिसांकडूनही रुग्णाच्या घरी जाऊन तपासणी केली जात आहे. होम आयसोलेशनमधील रुग्णांनी क्वारंटाईन कालावधीत प्रशासनास सहकार्य न केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला.

चौकट

शनिवार-रविवारी अत्यावश्यक सेवा सुरू, संचारबंदी कडक

शुक्रवारी रात्रीपासून सोमवार सकाळपर्यंत पूर्णपणे लॉकडाऊन पाळण्यात येणार आहे. यामध्ये औषधे, किराणा दुकान, बेकरीसह अत्यावश्यक सेवा नागरिकांना मिळणार आहेत. मात्र संचारबंदी कडक असेल. बाहेर पडण्यासाठी महत्त्वाचे कारण असेल तरच घराबाहेर पडावे. या कालावधीत सर्व बंद असले, तरी अत्यावश्यक सेवा देणाऱ्या आस्थापना चालू राहणार असल्याचेही जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी स्पष्ट केले.