शहरं
Join us  
Trending Stories
1
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
2
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
3
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
4
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
5
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
6
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं
7
"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'...", पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला केदार शिंदेंचा तीव्र विरोध
8
मुंबई: मृत मुलाच्या वीर्यासाठी आईची धडपड, सेंटरने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयात धाव
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
SL vs BAN : मॅचसह मालिका गमावली अन् लगेच कॅप्टन्सी सोडली! पहिल्या टेस्टमध्ये बेस्ट खेळीसह रचला होता इतिहास
11
भांडूपमधील प्रकरण जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल
12
३० जूनला PPF, SSY सारख्या योजनांचे व्याजदर कमी होणार? सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता, पाहा डिटेल्स
13
Vaijapur Crime: वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या, छ. संभाजीनगरात खळबळ!
14
Astro Tips: कुंडलीत 'ही' ग्रहस्थिती दर्शवते जोडीदाराचे विवाहबाह्य संबंध; वाढतो जीवाला धोका!
15
"फडणवीसांना खूपच धूर्त म्हणावं लागेल, प्रत्येक अधिवेशनाआधी ते एक फासा फेकतात आणि...", अंजली दमानियांचं सूचक ट्विट
16
'ही' महारत्न कंपनी देणार ३००% चा डिविडेंड; ५ वर्षांत शेअरमध्ये ११८४ टक्क्यांची तेजी, तुमच्याकडे आहे का?
17
‘किंग बिबी’ला जग एवढं का घाबरतं? त्यांनी इराणलाही शिंगावर घेतलं
18
कोण आहे शेफालीचा पती? ५ वर्षांतच मोडलेला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...
19
"माझा मुलगा सरन्यायाधीश होईल, पण ते पाहायला मी नसेल"; वडिलांची आठवण येताच भावुक झाले CJI गवई
20
Local Train Mega Block: रविवारी मुंबईत फिरण्याचा प्लॅन; मग मेगाब्लॉक अपडेट जाणून घ्या

रस्त्यासाठी ढवळी ग्रामस्थांचा ठिय्या

By admin | Updated: December 30, 2016 23:54 IST

दुरूस्तीची मागणी : आंदोलनामुळे मिरज-बेळगाव रस्त्यावरील वाहतूक ठप्प

मिरज/नरवाड : वड्डी-ढवळी रस्ता दुरूस्त करण्याच्या मागणीसाठी सर्वपक्षीय कार्यकर्ते व ग्रामस्थांनी मिरज-म्हैसाळ रस्ता रोखून धरणे आंदोलन केले. यावेळी म्हैसाळ रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. आंदोलकांनी विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांकडे दिले.वड्डी ते ढवळी या चार किलोमीटर खराब झालेल्या रस्त्याच्या दुरुस्तीकडे शासनाने दुर्लक्ष केले आहे. याच्या निषेधार्थ २ आॅक्टोबरच्या ग्रामसभेतील निर्णयानुसार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीवर ढवळीच्या ग्रामस्थांनी यापूर्वीच बहिष्कार घातला आहे. प्रतिवर्षी ढवळीच्या नदीतून महसूल विभागाला माती, वाळूच्या माध्यमातून सात ते आठ कोटी रुपये उत्पन्न मिळते. शासन पैैसे घ्यायला तयार आहे, मात्र रस्त्यावर पैसे खर्च करायला तयार नसल्याने, ग्रामस्थांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याची तयारीही केली आहे. शासनाने मात्र ग्रामस्थांचा विरोध झुगारून वाळूचे ठेके देण्याचे काम सुरूच ठेवले आहे.याच्या निषेधार्थ ढवळीच्या ग्रामस्थांनी शुक्रवारी रास्ता रोको आंदोलन केले. मिरज ते बेळगाव (कर्नाटक) हा राष्ट्रीय महामार्ग तब्बल दीड तास रोखून धरण्यात आला होता. वाळूचा ठेका बंद झाला पाहिजे, अशी मागणीही करण्यात आली. रस्ता दुरूस्तीसाठी कोणीही दखल घेत नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी शुक्रवारी सकाळी मिरज-म्हैसाळ रस्ता रोखून धरला. यामध्ये शिवसेना, भारिप बहुजन महासंघाचे कार्यकर्ते, ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने सहभागी होत्या. एक तास रस्ता रोखून धरल्याने दोन्ही बाजूला वाहतूक ठप्प होती. आंदोलनात वाळू ठेका बंद करण्याच्या मागणीसाठी आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला. ग्रामसभेच्या ठरावाची पायमल्ली केल्याबद्दल आंदोलकांनी शासनाचा धिक्कार केला. आंदोलनाची माहिती मिळताच नायब तहसीलदार शेखर परब यांनी त्वरित घटनास्थळी भेट देऊन ग्रामस्थांच्या सह्णांचे निवेदन स्वीकारले. रस्ता दुरुस्तीसाठी ५० लाख रुपये खर्चाच्या प्रशासकीय मंजुरीसाठी २८ डिसेंबरला जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव दिल्याचे परब यांनी यावेळी सांगितले. त्यानंतर रास्ता रोको मागे घेण्यात आला. प्रशासनाकडून लवकरच रस्त्याचे काम सुरू करू, असे आश्वासन सरपंच अश्विनी पाटील व शिवसेनेचे तानाजी सातपुते, पृथ्वीराज पवार, सुवर्णा मोहिते, गजानन मोरे, नागेश पाटील, आर. आर. पाटील, विशाल रजपूत यांच्यासह इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिले. यावेळी पोलिस उपअधीक्षक धीरज पाटील, पोलिस निरीक्षक सदाशिव शेलार, राजू मोरे यांच्यासह मोठा पोलिस फौजफाटा आंदोलनाच्या ठिकाणी ठेवण्यात आला होता. (वार्ताहर)