ओळी :
संजयनगर येथे महापालिकेच्या पथकाने मोकाट कुत्री पकडण्याची मोहीम सुरू केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
संजयनगर : महापालिका आरोग्य विभागातील कर्मचारी परशुराम कांबळे व बालिका आराध्या दुपटे हिच्यावर मोकाट कुत्र्याने हल्ला केल्यानंतर, अखेर आयुक्त नितीन कापडणीस यांच्या आदेशाने संजयनगर परिसरातील भटकी कुत्री पकडण्याची मोहीम सुरू झाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून संजयनगर परिसरात मोकाट कुत्र्यांनी नागरिकांवर हल्ले केले आहेत. मंगळवारी महापालिका आरोग्य विभागातील डाॅग व्हॅनवर काम करणारे कर्मचारी परशुराम कांबळे यांच्यावर माेकाट कुत्र्यांनी हल्ला केला. तत्पूर्वी संजयनगर येथील बालिका आराध्या दुपटे हिच्यावरही कुत्र्यांनी हल्ला केला हाेता. याची माहिती मिळताच आयुक्त नितीन कापडणीस यांनी मोकाट कुत्री पकडण्याबाबत आदेश दिल्यानंतर प्रशासनाकडून बुधवारपासून मोकाट भटकी कुत्री पकडण्यास सुरुवात करण्यात आली आहे.