शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

अनिलभाऊ नावाचं वादळ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:28 IST

शेतकऱ्यांच्या शेतीपाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी आमदार भाऊंनी केलेले काम कौतुकास्पद आहे. खानापूर, आटपाडी तालुक्यांसह विसापूर सर्कलमधील शेतकऱ्यांच्या शेतीला ...

शेतकऱ्यांच्या शेतीपाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी आमदार भाऊंनी केलेले काम कौतुकास्पद आहे. खानापूर, आटपाडी तालुक्यांसह विसापूर सर्कलमधील शेतकऱ्यांच्या शेतीला टेंभू, आरफळ व ताकारी योजनेचे पाणी देऊन दुष्काळी शेतकऱ्याला आर्थिक पाठबळ देण्यासाठी आमदार अनिलभाऊ आजही काम करीत आहेत. दुष्काळी शेतकऱ्यांचा आश्वासक नेता म्हणून ते सर्वसामान्य जनतेच्या हृदयसिंहासनावर विराजमान झाले आहेत.

केवळ सत्तेसाठी राजकारण न करता शेतकरी व सर्वसामान्य जनता आणि मतदारसंघाचा विकास हेच ध्येय समोर ठेवून आमदार अनिलभाऊंनी उचललेले विकासाचे पाऊल कौतुकास्पद आहे. त्यांनी गेल्या पाच ते सहा वर्षांपासून टेंभूचे पाणी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत देण्यासाठी योजनेला गती दिली आहे. त्यामुळेच आज खानापूरच्या पूर्व भागातील अग्रणी नदी टेंभूच्या पाण्याने खळखळून वाहू लागली आहे. तसेच खानापूर, लेंगरे यांसह तालुक्यातील विविध पाझर तलावांत टेंभूचे पाणी सोडून दुष्काळी परिसरात भूजल पातळीवर मोठी वाढ झाली आहे. आमदार अनिलभाऊंनी सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी केलेले काम आजही दखलपात्र आहे. खानापूर पूर्व भागाला दिलासा देण्यासाठी टेंभू योजनेचे आणखी दोन टप्पे पूर्णत्वासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. पळशीसह अन्य गावांचा टेंभू योजनेच्या लाभक्षेत्रात समावेश करण्यासाठी त्यांनी मोठा पाठपुरावा केला आहे. या योजनेच्या उर्वरित कामांच्या पूर्ततेसाठी ते आजही प्रयत्नशील आहेत. विधानसभा अधिवेशनात शेतकऱ्यांचे व दुष्काळी शेतीपाण्याचा प्रश्न घेऊन प्रसंगी सरकारविरुद्ध संघर्ष करण्याची तयारीही आ. अनिलभाऊंनी ठेवली आहे. खानापूर मतदारसंघात अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झाल्यानंतर सरकारदरबारी पाठपुरावा करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी त्यांनी मोठे योगदान दिले. नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खानापूर तालुक्याचा दौरा केला. त्यावेळी शेतकऱ्यांना अतिवृष्टीची नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी आमदार भाऊंचे प्रयत्न केल्याने शेतकऱ्यांना आधार मिळाला.

द्राक्ष बागायतदारांना प्लास्टिक आच्छादन, कर्जमाफी यांसह शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांचा जास्तीत जास्त लाभ कसा मिळेल, यासाठी आमदार भाऊ आजही प्रयत्नशील आहेत. टेंभू योजनेच्या सहाव्या टप्प्याला मंजुरी आणून वंचित गावांचा योजनेत समावेश करण्यासाठी आमदार भाऊंनी शासनदरबारी पाठपुरावा केला. खानापूर मतदारसंघात आता टेंभूचे पाणी आले. आता विजेचा प्रश्न निर्माण होणार असल्याने त्यांनी नुकतीच मंत्रालयात ऊर्जामंत्र्यांच्या दालनात शेतीसाठी लागणाऱ्या विजेचा प्रश्न सोडविण्यासाठी अधिकाऱ्यांची बैठक बोलावून त्याबाबत सकारात्मक चर्चा केली. आमदार अनिलभाऊंनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसोबत यंत्रमाग व पोल्ट्री व्यवसायाचे अनेक प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याच्यासमोर आमदार अनिलभाऊंनी शेतकरी, यंत्रमाग व पोल्ट्री उद्योजकांच्या व्यथा मांडून दुष्काळी खानापूर मतदारसंघाला न्याय देण्याची भूमिका घेतली. त्यामुळे आ. अनिलभाऊ हे शेतकऱ्यांच्या न्याय व हक्कांसाठी आजही लढत आहेत.

मतदारसंघातील दुष्काळी जनतेच्या प्रश्नांवर काम असल्यामुळे आ. अनिलभाऊंचा विविध विषयांचा सखोल अभ्यास आहे. आपल्या कार्यकर्त्यांना अभिमान वाटेल असे त्यांचे काम आहे.

जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहासभैया बाबर यांनीही आ. अनिलभाऊ यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेत उत्कृष्ट काम करून दुष्काळी खानापूर मतदारसंघाला न्याय मिळवून दिला आहे. नगरसेवक अमोलदादा व सुहासभैया यांनी मतदारसंघात युवा संघटन मजबूत करून आ. अनिलभाऊंच्या पाठीशी ताकद उभी केली आहे. आ. भाऊंनी कार्यकर्त्यांनाही मोठी ताकद दिली आहे. कार्यकर्त्यांचे प्रश्न सोडविण्याबरोबरच त्यांना दिलासा देण्याचे काम आ. भाऊंनी करून सर्वसामान्य जनतेशी असलेली नाळ कायम ठेवली आहे. खानापूर मतदारसंघातील विविध प्रश्न सोडविण्यासाठी आ. भाऊंनी मोठे योगदान दिले आहे. राष्ट्रीय महामार्ग, जलसिंचन योजना, वीज, रस्ते, आरोग्य यांसह अनेक प्रश्नांना आ. भाऊंनी प्राधान्य देऊन ते प्रश्न सोडविले आहेत. त्यामुळेच आज मतदारसंघातील जनता त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा असून त्यांना पूर्ण ताकद दिली आहे. आगामी काळातही केवळ शेतीपाण्याचा प्रश्न सोडवून टेंभूचे पाणी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत देण्याचे ध्येय आ. भाऊंनी ठेवले आहे. राजकारणातून समाजकारणाला प्राधान्य देऊन काम करीत असताना कितीही संकटे आली तरी त्यांनी खचून न जाता मोठ्या धाडसाने मतदारसंघाच्या विकासासाठी योगदान दिले आहे. त्यामुळे अनिलभाऊ नावाचं वादळ आज खानापूर मतदारसंघात घोंघावत आहे. त्यांचा आज, गुरुवारी वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा..!

-दिलीप मोहिते, विटा.

फोटो - ०६०१२०२१-विटा-अनिलभाऊ बर्थडे ०१ : लेंगरे ते माधळमुठी रस्त्याच्या कामाचे उद्घाटन आ. अनिलभाऊ बाबर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पंचायत समितीच्या माजी सभापती मनीषा बागल यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

फोटो - ०६०१२०२१-विटा-अनिलभाऊ बर्थडे ०२ : मुंबई येथे डाळींब बागांसाठी प्लास्टिक आच्छादनास अनुदान मिळावे यासाठी कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्या दालनात आ. अनिलभाऊ बाबर यांनी बैठकीचे आयोजन केले होते.