शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

उमदीत कडकडीत बंद, निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 23:48 IST

लोकमत न्यूज नेटवर्कउमदी : प्रशासनाने चुकीच्या पध्दतीने संख (ता. जत) येथे अप्पर तहसील कार्यालय सुरु करण्याच्या हालचाली चालविल्या आहेत. याचा निषेध करीत स्वतंत्र उमदी तालुका व अप्पर तहसील कार्यालय उमदीलाच व्हावे, या मागणीसाठी रविवारी उमदी येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली. रविवारचा आठवड बाजारही बंद ठेवून ...

लोकमत न्यूज नेटवर्कउमदी : प्रशासनाने चुकीच्या पध्दतीने संख (ता. जत) येथे अप्पर तहसील कार्यालय सुरु करण्याच्या हालचाली चालविल्या आहेत. याचा निषेध करीत स्वतंत्र उमदी तालुका व अप्पर तहसील कार्यालय उमदीलाच व्हावे, या मागणीसाठी रविवारी उमदी येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली. रविवारचा आठवड बाजारही बंद ठेवून शासनाचा निषेध करण्यात आला. सकाळी दहा वाजता ग्रामस्थांनी उमदी बसस्थानक चौकात एकत्र येऊन टायर पेटवून शासनाच्या मनमानी कारभाराचा निषेध केला.जत तालुक्यातील सर्व गावांना अंधारात ठेवून संख येथे अप्पर तहसील कार्यालय स्थापन करण्याच्या हालचाली सुरू आहेत. याला उमदीतील ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे. ग्रामस्थांच्या सोयीच्या ठिकाणीच अप्पर तहसील कार्यालय सुरू झाले पाहिजे, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. याशिवाय १२३ गावे व वाड्या-वस्त्या असलेला जत तालुका हा जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका आहे. या तालुक्याचे विभाजन करून नवीन दोन तालुके करता येणे शक्य आहे, मात्र प्रशासन चुकीचे निर्णय घेऊन वाद मिटविण्याऐवजी वाढविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप यावेळी ग्रामस्थांनी केला. जत तालुक्याचे विभाजन करून स्वतंत्र उमदी तालुका व्हावा, तसेच उप्पर तहसील कार्यालय उमदीलाच व्हावे, अशी मागणी करीत ग्रामस्थांनी कडकडीत बंद पाळला. प्रसंगी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन उभारू, असा इशारा यावेळी देण्यात आला.रविवारी सकाळपासूनच उमदीतील सर्व व्यवहार बंद होते. आठवडा बाजारही भरला नाही. परिणामी बाहेरगावहून आलेल्या बाजारकरूंची गैरसोय झाली. सकाळी उमदी बसस्थानक चौकात ग्रामस्थ एकत्र आले. टायर पेटवून देऊन शासनाच्या मनमानी कारभाराचा निषेध करण्यात आला. सर्वपक्षीय नेत्यांनी पक्ष, संघटना, मतभेद बाजूला ठेवून उमदी तालुक्यासाठी एकत्र लढा उभारण्याचा निर्धार केला.यावेळी पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष सुनील पोतदार म्हणाले, गेल्या अनेक वर्षापासून स्वतंत्र उमदी तालुक्यासाठी कृती समिती प्रयत्न करीत आहे. पूर्व भागातील ग्रामस्थांच्या सोयीचे ठिकाण उमदी आहे. संख व उमदी या गावात धार्मिक परंपरेमुळे कोणतेही व्यवहार होत नाहीत. याची माहिती असूनही संख येथे अप्पर तहसील कार्यालय सुरू करून प्रशासन नवीन वाद निर्माण करीत आहे. तातडीने हा निर्णय थांबवावा.माजी जिल्हा परिषद सदस्य अ‍ॅड. चन्नाप्पा होर्तीकर म्हणाले, उमदीला स्वतंत्र तालुक्याचा दर्जा द्यावा व ग्रामस्थांच्या सोयीच्या ठिकाणीच अप्पर तहसील कार्यालय सुरू करावे. अन्यथा तीव्र लढा उभारू. आज दुकाने व बाजार बंद ठेवून निषेध नोंदवित आहोत. वेळप्रसंगी तालुका व जिल्हा मार्गही बंद ठेवण्याची आमची तयारी आहे. तेव्हा प्रशासनाने योग्य तो निर्णय घ्यावा, असा इशारा त्यांनी दिला.निवृत्ती शिंदे म्हणाले, गेल्या २५ वर्षापासून आम्ही उमदी तालुक्यासाठी संघर्ष करीत आहोत. जत तालुक्याचे विभाजन करून दोन स्वतंत्र तालुके करण्यात कोणतीही अडचण नाही. तरीही दिशाभूल करून संख व उमदी असा नवीन वाद निर्माण करण्याचा राजकीय डाव सुरू आहे. मात्र उमदीकरांच्या भावना तीव्र आहेत. प्रशासनाने लोकांचा अंत पाहू नये.यावेळी सरपंच सावित्री होर्तीकर, उपसरपंच निसारभाई मुल्ला, सुरेश कुल्लोळी, बंडोपंत शेवाळे, मानसिध्दा पुजारी, रमेश हाक्के, मल्लू सालुटगी, धोंडीराम शिंदे यांनीही तीव्र भावना व्यक्त केल्या.बाजारकरूंची गैरसोयउमदीसह तेरा गावांच्या सोयीचा असणारा उमदीचा आठवडा बाजार रविवारी बंद होता. यामुळे बाजारकरूंची गैरसोय झाली. उमदीचा आठवडा बाजार हा परिसरातील सर्वात मोठा बाजार असल्याने व्यापाºयांचाही खोळंबा झाला. मात्र अप्पर तहसील कार्यालयाबाबत उमदीकरांच्या भावना तीव्र असल्याने सर्वांनीच आंदोलनाला पाठिंबा देत ग्रामस्थांच्या पाठीशी राहण्याचा निर्धार व्यक्त केला.