शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सांगली मार्केट यार्डात आजपासून बेमुदत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 23:34 IST

सांगली : येथील मार्केट यार्डातील १३०० व्यापाऱ्यांना केंद्रीय वस्तू व सेवा कर कार्यालयाने बजाविलेल्या नोटिसांविरोधात व्यापाºयांनी बुधवारी २४ आॅक्टोबरपासून ...

सांगली : येथील मार्केट यार्डातील १३०० व्यापाऱ्यांना केंद्रीय वस्तू व सेवा कर कार्यालयाने बजाविलेल्या नोटिसांविरोधात व्यापाºयांनी बुधवारी २४ आॅक्टोबरपासून बेमुदत बंद पुकारला आहे, अशी माहिती चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष शरद शहा, उद्योजक माधव कुलकर्णी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.ते म्हणाले की, सांगली मार्केट यार्डातील १३०० व्यापाºयांना केंद्रीय सेवा व कर कार्यालयाकडून ३० जुलै २०१२ पासूनच्या अडत व कमिशनवरील सेवाकर भरण्याच्या नोटिसा आल्या आहेत. नोटिशीनुसार दंड भरण्याची व दंड न भरल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. संपूर्ण राज्यात फक्त सांगलीतच व्यापाºयांना सेवाकराच्या नोटिसा आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सांगली चेंबर आॅफ कॉमर्सच्या पदाधिकाºयांनी पंधरा दिवसांपूर्वी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेत सेवाकराच्या अन्यायकारक नोटिसीविरोधात दाद मागितली होती. त्यांनी कारवाई न करण्याचे आश्वासन दिले होते. तरीही अधिकाºयांकडून कारवाई सुरू केल्यानेच याच्या निषेधार्थ मार्केट यार्ड व्यापाºयांनी बेमुदत बंदचा निर्णय घेतला आहे.कायदा हा सर्वत्र समान असला पाहिजे, मात्र संपूर्ण देशात कुठेही नोटिसा न देता केवळ सांगलीत अशाप्रकारच्या नोटिसा देऊन अधिकाºयांनी मनमानी कारभार सुरू केला आहे. सणासुदीच्या काळातच व्यापाºयांना स्वत:चे नुकसान करून बंदचे आंदोलन नाईलाजास्तव पुकारावे लागत आहे. वास्तविक येथील व्यापाºयांना किती कमिशन घ्यायचे हे ठरलेले आहे. एक रुपयासुद्धा शेतकºयांकडून जादा घेतला तर, आमचे परवाने रद्द होऊ शकतात. पणन विभागाने त्यासंदर्भात आदेशच दिले आहेत. तरीही जीएसटी विभाग आमच्याकडून अशाप्रकारच्या अपेक्षा का बाळगत आहे. पणनचा कोणताही आदेश नसताना व्यापारी कोणताही कर कसा गोळा करू शकतात? त्यामुळे संबंधित अधिकाºयांनी त्यांनी मनमानी बंद करावी. बुधवारी सायंकाळी पुन्हा बैठक होऊन आंदोलनाची पुढील दिशा ठरविली जाणार आहे, असे ते म्हणाले.कोणाची सुपारी : घेतली आहे?संबंधित वस्तू व सेवा कर विभागाच्या अधिकाºयांनी सरकारला बदनाम करण्यासाठी विरोधी पक्षांची सुपारी घेतली आहे का, अशी आम्हाला शंका वाटत आहे, असे माधव कुलकर्णी म्हणाले. मंत्री, खासदार, आमदार यांचे आदेशही न मानणाºया या अधिकाºयांच्या कारवाई करण्यामागे नेमके गणित काय आहे, याचा शोध घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.