शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत चारचाकीने घेतले पेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:26 IST

सांगली : सांगली - मिरज रस्त्यावरील जिल्हा परिषदेजवळ गुरुवारी रात्री चारचाकी गाडीने अचानक पेट घेतला. यात गाडीचे मोठे नुकसान ...

सांगली : सांगली - मिरज रस्त्यावरील जिल्हा परिषदेजवळ गुरुवारी रात्री चारचाकी गाडीने अचानक पेट घेतला. यात गाडीचे मोठे नुकसान झाले. महापालिकेच्या अग्निशमन विभागाने ही आग आटोक्यात आणली.

शिंदे मळा येथे राहणाऱ्या अमृता सिताफे या रात्री अकराच्या सुमारास घरी निघाल्या होत्या. त्या चारचाकीत एकट्या होत्या. राममंदिर चौकातून पुष्पराज चौकाकडे जाताना चर्चजवळ आल्या असताना अचानक चारचाकी गाडीतून धूर आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने गाडी रस्त्याच्या कडेला घेतली. त्या खाली उतरताच गाडीने पेट घेतला. चारचाकीच्या बाॅनेटमधून आगीचा लोट येत होता. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक थांबविण्यात आली.

रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी तातडीने महापालिकेच्या अग्निशमन विभागाला आगीची माहिती दिली. अग्निशमन विभागाचे विक्रम घाडगे, सुधीर मोहिते, विजय कांबळे, अमोल गडदे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पाण्याचा फवारा मारून आग विझविण्यात आली. या आगीत गाडीचा पुढचा भाग जळून खाक झाला. या घटनेत कुणालाही इजा झाली नाही.