शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

तासगावात कारभारी निष्क्रिय; खासदार सक्रिय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:14 IST

तासगाव : तासगाव नगरपालिकेची निवडणूक काही महिन्यांवर आली आहे. तत्पूर्वी खासदार संयजकाका पाटील स्वत: पालिकेच्या मैदानात उतरले आहेत. मतदारांशी ...

तासगाव : तासगाव नगरपालिकेची निवडणूक काही महिन्यांवर आली आहे. तत्पूर्वी खासदार संयजकाका पाटील स्वत: पालिकेच्या मैदानात उतरले आहेत. मतदारांशी थेट कनेक्ट होत पालिकेतील सत्ता कायम ठेवण्यासाठी खासदार पाटील यांनी आतापासूनच मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. मात्र गेल्या चार वर्षांतील पालिकेतील सत्ताधाऱ्यांचा कारभार पाहिल्यामुळे ‘कारभारी निष्क्रिय आणि खासदार सक्रिय’ असाचा प्रकार राहिला आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचा निधी मिळवूनदेखील निवडणुकीच्या तोंडावर खासदारांनाच मैदानात उतरण्याची वेळ आली आहे.

तासगाव नगरपालिकेत गतवेळी झालेल्या निवडणुकीत भाजपने एकहाती सत्ता मिळवली. त्यावेळी केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता असल्याने आणि तासगाव नगरपालिकेत पहिल्यांदाच कमळ फुलल्यामुळे विकासकामांसाठी खासदार पाटील यांनी सत्तेचा पुरेपूर उपयोग करून तासगाव शहरासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मिळवला. एकीकडे खासदारांकडून कोट्यवधी रुपयांचा निधी मिळत असताना, दुसरीकडे पालिकेतील सत्ताधाऱ्यांचे कारनामे जोमोने सुरू होते.

सत्ताधाऱ्यांकडून मिळालेल्या निधीला नियमांची चाकोरी तयार करण्यात आली. विकासकामांचा दिखावा करत निधीवर डल्ला मारण्याचे कारनामे सुरू राहिले. चार वर्षांत सत्ताधाऱ्यांचा कारभार वादग्रस्त राहिला. स्वच्छता ठेक्यापासून प्रभागात होणाऱ्या किरकोळ काँक्रिटीकरणाच्या कामापर्यंत सत्तेतील बहुतांश कारभारांनी नेहमीच इंटरेस्ट दाखवला. बगलबच्च्यांच्या नावावर कामे घेण्यापासून ते ठेकेदारांवर दबाव टाकून टक्केवारी घेण्यापर्यंत अनेकदा चर्चा होत राहिल्या. त्यामुळे सत्ताधारी नगरसेवकांपैकी काही अपवाद वगळता बहुतांश नगरसेवकांना लोकांच्या मनात कामातून ठसा उमटवण्यात सपशेल अपयश आले.

नगरपालिका निवडणूक काही महिन्यानंतर होणार आहे. पालिकेत भाजपची एकहाती सत्ता कायम ठेवण्याचा आव्हान खासदार संजयकाका पाटील यांच्यासमोर आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वीच खासदार पाटील यांनी स्वत: मैदानात उतरून लोकांशी संपर्क साधण्यासाठी मोहीम सुरू केली आहे.

चौकट :

खासदारांचा पहिल्यांदाच जनता दरबार

खासदार संजयकाका पाटील यांनी बुधवारी रात्री शहरातील बापूवाडी, अमृतेश्‍वरनगर परिसरातील नागरिकांशी जनता दरबाराच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी चार वर्षांत केलेल्या विकासकामांचा आढावा घेत, नागरिकांनी सांगितलेल्या समस्यांचा तातडीने निपटारा करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. खासदार पाटील यांनी जनता दरबाराच्या माध्यमातून पहिल्यांदाच कनेक्ट होण्याचा उपक्रम राबविल्याने शहरात चर्चेचा विषय ठरला आहे.