शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

तासगावात कारभारी निष्क्रिय; खासदार सक्रिय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:15 IST

दत्ता पाटील तासगाव : तासगाव नगरपालिकेची निवडणूक काही महिन्यांवर आली आहे. तत्पूर्वी खासदार संजयकाका पाटील स्वत: पालिकेच्या मैदानात उतरले ...

दत्ता पाटील

तासगाव : तासगाव नगरपालिकेची निवडणूक काही महिन्यांवर आली आहे. तत्पूर्वी खासदार संजयकाका पाटील स्वत: पालिकेच्या मैदानात उतरले आहेत. मतदारांशी थेट कनेक्ट होत पालिकेतील सत्ता कायम ठेवण्यासाठी त्यांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. मात्र गेल्या चार वर्षांतील पालिकेतील सत्ताधाऱ्यांचा कारभार पाहिल्यामुळे कारभारी निष्क्रिय आणि खासदार सक्रिय असाचा प्रकार राहिला आहे.

कोट्यवधी रुपयांचा निधी मिळवूनदेखील निवडणुकीच्या तोंडावर खासदारांनाच मैदानात उतरण्याची वेळ आली आहे. तासगाव नगरपालिकेत गतवेळी झालेल्या निवडणुकीत भाजपने एकहाती सत्ता मिळवली. त्यावेळी केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता असल्याने आणि नगरपालिकेत पहिल्यांदाच कमळ फुलल्यामुळे विकासकामांसाठी खासदार पाटील यांनी सत्तेचा पुरेपुर उपयोग करून कोट्यवधींचा निधी मिळवला. दुसरीकडे पालिकेतील सत्ताधाऱ्यांचे कारनामे जोमाने सुरू होते.

निधीला नियमांची चाकोरी तयार करण्यात आली. विकासकामांचा दिखावा करत निधीवर डल्ला मारण्याचे कारनामे सुरू राहिले. चार वर्षांत कारभार वादग्रस्त राहिला. स्वच्छता ठेक्यापासून किरकोळ काँक्रिटीकरणाच्या कामापर्यंत सत्तेतील बहुतांश कारभारांनी नेहमीच ‘इंटरेस्ट’ दाखवला. बगलबच्च्यांच्या नावावर कामे घेण्यापासून ते ठेकेदारांवर दबाव टाकून टक्केवारी घेण्यापर्यंत अनेकदा चर्चा होत राहिल्या. त्यामुळे सत्ताधारी नगरसेवकांपैकी काही अपवाद वगळता बहुतांश नगरसेवकांना लोकांच्या मनात कामातून ठसा उमटवण्यात सपशेल अपयश आले.

सत्तेत येण्याआधी दिलेली आश्‍वासने हवेत विरली. जनतेच्या प्रश्‍नांसाठी अट्टाहास करण्याऐवजी केवळ स्वत:चा स्वार्थ साधण्यासाठीच रस्सीखेच सुरू राहिली.

नगरपालिका निवडणूक काही महिन्यानंतर होणार आहे. पालिकेत भाजपची एकहाती सत्ता कायम ठेवण्याचा आव्हान खासदार संजयकाका पाटील यांच्यासमोर आहे. त्यामुळे त्यांनी स्वत: मैदानात उतरून लोकांशी संपर्क साधण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. लोकांच्या अडीअडचणी जाणून घेत, प्रशासनाच्या माध्यमातून केलेली विकासकामे पोहोचविण्यासाठी जनता दरबार भरवण्यास सुरुवात केली आहे.

चौकट

खासदारांचा पहिल्यांदाच जनता दरबार

खासदार संजयकाका पाटील यांनी बुधवारी रात्री शहरातील बापूवाडी, अमृतेश्‍वरनगर परिसरातील नागरिकांशी जनता दरबाराच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी चार वर्षांत केलेल्या विकासकामांचा आढावा घेत, समस्यांचा तातडीने निपटारा करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. खासदार पाटील यांनी जनता दरबाराच्या माध्यमातून पहिल्यांदाच कनेक्ट होण्याचा उपक्रम राबविल्याने शहरात चर्चेचा विषय ठरला आहे.