शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत राजारामबापूंचा पुतळा उभारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:26 IST

सांगली : लोकनेते (स्व.) राजारामबापू पाटील यांचा पुतळा सांगलीत उभारण्यासाठी महापालिकेतील राष्ट्रवादीने पुढाकार घेतला आहे. येत्या सोमवारी होणाऱ्या महासभेत ...

सांगली : लोकनेते (स्व.) राजारामबापू पाटील यांचा पुतळा सांगलीत उभारण्यासाठी महापालिकेतील राष्ट्रवादीने पुढाकार घेतला आहे. येत्या सोमवारी होणाऱ्या महासभेत प्रस्ताव आणण्याच्या हालचाली सुरू असून स्टेशन चौकात वसंतदादा स्मारकालगतच्या महापालिकेच्या जागेत हा पुतळा उभारण्यावर शिक्कामोर्तब केले जाणार आहे. त्याशिवाय इतर काही जागांचाही शोध घेण्याच्या सूचना महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी दिल्या आहेत.

महापालिकेत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली दोनदा सत्ता आली; पण आजअखेर महापालिका क्षेत्रात राजारामबापूंचा पुतळा उभारला गेलेला नाही. भाजपच्या सत्ताकाळात राष्ट्रवादीने पुतळा उभारण्याचा प्रस्ताव दिला होता. पण त्यावर निर्णय होऊ शकला नाही. आता महापालिकेच्या सत्तेची सूत्रे राष्ट्रवादीकडे आहेत. त्यामुळे राजारामबापूंचा पुतळा उभारणीचे स्वप्न सत्यात आणण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. राष्ट्रवादीचे नगरसेवक शेडजी मोहिते यांनी याबाबत महासभेकडे प्रस्ताव दिला आहे.

येत्या १९ रोजी महासभा होत आहे. त्या सभेत राजारामबापूंचा पुतळा उभारणीवर शिक्कामोर्तब केले जाईल. सध्या स्टेशन चौकातील वसंतदादा स्मारकालगत महापालिकेच्या जुन्या जकात कार्यालयासमोर जागा उपलब्ध आहे. त्यातच स्टेशन चौकातील सिटीबस थांबाही बंद पडल्याने त्या जागेत पुतळा उभारण्याचा विचार सुरू आहे. पण या जागेवरून काँग्रेस व राष्ट्रवादीत वाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच महापौर सूर्यवंशी यांनी स्टेशन चौकासह इतर जागांचाही शोध घेण्याची सूचना राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना केली आहे.

चौकट

भूसंपादनासह परवाना शुल्कावर चर्चा

मिरज शहर विकास योजना नकाशानुसार नियोजित ख्वाजा कॉलनी वसाहत ते मिरज-कोल्हापूर महामार्गापर्यंत जागेतून जाणाऱ्या शंभर फुटी रस्त्याचे भूसंपादन करण्यास मान्यता देण्याचा विषय महासभेच्या अजेंड्यावर आहे. महाराष्ट्र अग्नि सुरक्षा अभियान अंतर्गत पदनिर्मितीस मान्यता तसेच हनुमाननगर ऑक्सिडेशन पॉईंट व माळबंगला ७० एमएलडी जलशुद्धिकरण केंद्र या दोन्ही जागांवर फायर स्टेशन, संजयनगर अभयनगर येथील महापालिकेच्या खुल्या जागेत नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र क्रमांक ६ चे बांधकाम करण्यासाठी कामाची जागा बदलणे, महापालिका क्षेत्रातील विविध प्रकारचे व्यवसायधारकांचे दंड माफ करून व्यवसाय परवाना फी भरून घेण्यास मान्यता देण्याचा विषयही अजेंड्यावर आहे.