कवठेमहांकाळ येथील महावितरणच्या कार्यालयात जाऊन शिवसेना, मनसे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, गेली दहा-बारा वर्षे शेती पंपाचे मीटर रीडिंग घेतले नाही. त्यामुळे अवाच्या सव्वा वीज बिले शेतकऱ्यांना आली आहेत. गेली दहा बारा वर्षे शेतीला पाणी नाही, या दोन वर्षात कोरोनाची महामारी सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. हे वीज बिल भरण्यास शेतकरी असमर्थ आहेत. त्यामुळे तोडलेली कनेक्शन त्वरित जोडावीत, अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन छेडू.
या निवेदनावर शिवसेना तालुकाप्रमुख मारुती पवार, मनसेचे धनंजय शिंदे, आबा मिस्त्री, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शिवाजी पाटील, सुरज पाटील, सर्जेराव लंगोटे, नरसिंहगावचे उपसरपंच अरुणराजे भोसले, प्रशांत कदम उपस्थित होते.