शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामपुरात सोमवारपासून राज्य कला प्रदर्शन

By admin | Updated: December 31, 2015 00:33 IST

चित्र-शिल्पकृतींचा आविष्कार : सातशे कलाकृती; विविध कार्यक्रम

इस्लामपूर : राज्यभरातील कला महाविद्यालयांतील उदयोन्मुख कलाकार विद्यार्थ्यांची चित्रे आणि शिल्पकृतींचा आविष्कार इस्लामपूर येथे ४ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या ५६व्या राज्य कला प्रदर्शनातून पाहायला मिळणार आहे. राज्याच्या कला संचालनालयाच्या वतीने सात दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनाचे आयोजन राजारामबापू चित्रकला महाविद्यालयात करण्यात येणार असल्याची माहिती सांगलीच्या कलापुष्प संस्थेचे सचिव प्रा. बाळासाहेब पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.प्रा. पाटील म्हणाले की, राज्यभरातील चार शासकीय व दोनशे अनुदानित-विनाअनुदानित कला महाविद्यालयांतील सातशे निवडक कलाकृतींची निवड केली आहे. येथील नगरपालिकेच्या जयंत पाटील खुल्या नाट्यगृहात ४ जानेवारीस सायंकाळी पाचला शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन होईल. यावेळी गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर, माजी मंत्री आमदार जयंत पाटील, प्रमुख उपस्थित असतील. प्रभारी कला संचालक राजीव मिश्रा निमंत्रक आहेत. प्रदर्शनातून कलाकारांचे परिश्रम, त्यांची ताकद, कौशल्ये, तपश्चर्या पाहायला मिळेल. चित्र, शिल्प, धातीकाम, मातकाम, वस्त्रकला अशा विविध विभागातील सातशे कलाकृती प्रदर्शनात मांडण्यात येणार आहेत. १0 जानेवारीपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे.ते म्हणाले की, उद्घाटनाच्या प्रमुख कार्यक्रमात पारितोषिक वितरण, सांस्कृतिक कार्यक्रम आणि प्रसिध्द कलाकार डॉ. नलिनी भागवत यांचा सत्कार होईल. ६ जानेवारीला सकाळी नऊ वाजता डॉ. आंबेडकर पुतळ्याजवळ प्रसिध्द सुलेखनकार अच्युत पालव हे, चित्रे आकाराला कशी येतात याचे रहस्य उलगडून दाखवतील. याचदिवशी जिल्हा कलाध्यापक संघाच्या उद्बोधन वर्गाचे उद्घाटन होईल. (प्रतिनिधी)