कवठेमहांकाळ : ओबीसी राजकीय आरक्षणाचा मुद्दा मार्गी न लावताच ओबीसीचे राजकीय अस्तित्व संपवण्यासाठी राज्य सरकारने निवडणूक आयोगामार्फत जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत, असा आरोप बहुजन समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष ॲड. संदीप ताजने यांनी केला.
येथे मंगळवारी बहुजन समाज पार्टीचा कार्यकर्ता मेळावा तसेच संवाद यात्रेचा कार्यक्रम पार पडला. यावेळी ताजने बोलत होते.
ताजने म्हणाले की, राज्य सरकार ओबीसीच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न जोपर्यंत सोडवत नाही, तोपर्यंत निवडणुकाच पुढे ढकल्याव्यात, अन्यथा ओबीसी समाजाच्या हक्कासाठी बसपा रस्त्यावर उतरून संघर्ष करेल.
प्रदेश सचिव शंकर माने म्हणाले की, कवठेमहांकाळ नगरपंचायत बहुजन समाज पार्टी स्वबळावर लढेल. मतदारसंघात बसपाच्या भीतीने प्रस्थापित राज्यकर्ते एकत्रित येऊन राजकारण करीत आहेत.
जिल्हा प्रभारी अतुल कांबळे, जिल्हाध्यक्ष लहरीदास कांबळे, दत्तात्रय बामणे, संजय थोरवत, जिल्हा महासचिव भूषण चंदनशिवे, अजय चंदनशिवे, इरळीच्या सरपंच संजना आठवले, मन्सूर आत्तार, देवानंद जावीर उपस्थित होते.
-----------------------------------------------------------------------