शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

कडेगावसाठी टेंभूच्या आवर्तनास प्रारंभ...

By admin | Updated: December 12, 2014 23:36 IST

कालव्यांद्वारे पाणी : साडेचार हजार हेक्टर क्षेत्राला दिलासा

कडेगाव : टेंभू उपसा सिंचन योजना कडेगाव तालुक्यासाठी रब्बी हंगामातील पहिले आवर्तन सुरू झाले. शिवाजीनगर येथील टप्पा क्रमांक २ चे २ पंप सुरू झाले आहेत. यामुळे सुर्ली आणि कामथी कालव्याद्वारे साडेतीन हजार हेक्टर शेतजमिनीला पाणी मिळणार आहे. याशिवाय मुख्य कालव्याद्वारे हिंगणगाव तलावापर्यंत व त्यापुढे माहुलीपर्यंत १ हजार हेक्टर असे एकंदरीत साडेचार हेक्टर कडेगाव तालुक्यातील लाभक्षेत्राला दिलासा मिळाला. योजनेचे टेंभू येथील टप्पा क्रमांक १ (अ) चे ९ पंप व टप्पा क्रमांक १ (ब) चे १० पंप असे १९ पंप यापुर्वीच सुरू झाले आहेत. परंतु दुष्काळी सांगोला तालुक्यासाठी मुख्य कालव्याद्वारे पाणी दिले जात होते. कडेगाव तालुक्यातील लाभक्षेत्राला पाणी दिलेले नव्हते. शेतकऱ्यांनी ५० टक्के हून अधिक लाभक्षेत्राचे पाणी मागणी अर्ज दिले व योजनेचे सुर्ली कामथी कालव्याद्वारे आवर्तन सुरू झाले.टेंभू योजनेच्या सुर्ली कालव्याद्वारे खांबाळे, नेर्ली, अपशिंगे, कोतवडे, कडेगाव, कडेपूर, हिंगणगाव (खुर्द) आदी गावांच्या लाभक्षेत्राला फायदा होणार आहे. याशिवाय कामथी कालव्याद्वारे शाळगाव, शिवाजीनगर, बोंबळेवाडी, कामथी आदी गावांच्या लाभक्षेत्राला फायदा होणार आहे. याशिवाय योजनेच्या मुख्य कालव्यातून शिवाजीनगरचा उर्वरित भाग, विहापूर,येडे, हिंगणगाव बुद्रुक परिसराला पाणी मिळणार आहे. रब्बी हंगामात तीन अवर्तन देण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. पूर्ण क्षमतेने कडेगाव तालुक्यास पाणी सोडले आहे. (वार्ताहर)