शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात मुद्रांक तस्करी जोरात; शंभराचा मुद्रांक १२० रुपयांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:31 IST

फोटो ०७ स्टॅम्प लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : गेल्या महिन्याभरापासून जिल्हाभरात मुद्रांकांचा प्रचंड काळाबाजार सुरू आहे. शंभर रुपयांचा मुद्रांक ...

फोटो ०७ स्टॅम्प

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : गेल्या महिन्याभरापासून जिल्हाभरात मुद्रांकांचा प्रचंड काळाबाजार सुरू आहे. शंभर रुपयांचा मुद्रांक १२० रुपयांना विकला जात आहे. यासंदर्भात मोठ्या प्रमाणात तक्रारी येऊनही काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई झालेली नाही.

जिल्ह्यात मुद्रांकांची टंचाई नसतानाही काळाबाजार सुरू आहे. सांगली, मिरज, कुपवाडसह ग्रामीण भागातील मुद्रांक विक्रेत्यांकडून ग्राहकांची अडवणूक सुरू आहे. प्रत्येक मुद्रांकासाठी २० रुपये जादा वसूल केले जात आहेत, अन्यथा मुद्रांक शिल्लक नसल्याचे सांगितले जात आहे. डिसेंबर महिन्यात शासनाने मालमत्ता खरेदीमध्ये थेट ५० टक्क्यांची सूट जाहीर केली होती. ३१ डिसेंबरपर्यंत चलन भरल्यास मार्चअखेरपर्यंत दस्त करण्याची सूट होती. या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुद्रांकांची मागणी प्रचंड वाढली. त्याचा नेमका फायदा मुद्रांक विक्रेत्यांनी उचलला.

मुद्रांक अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता टंचाई किंवा तुटवडा नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले, प्रत्यक्षात विक्रेते मात्र टंचाई असल्याचे सांगत जादा पैशांची वसुली करीत होते. मुद्रांकाचे मूल्य वाढेल तशी वसुलीची रक्कमही वाढत होती. सांगलीत राजवाडा परिसरात एकाच विक्रेत्याकडे मुद्रांक उपलब्ध असल्याने ग्राहकांची झुंबड उडत आहे; पण विक्रीसाठी वेगळी सोय प्रशासनाने केलेली नाही.

चौकट

ग्रामपंचायत निवडणुकीमुळेही मागणी वाढली

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांकडून मुद्रांकाची मागणी वाढल्यानेही काळ्या बाजाराला ऊत आला. उमेदवारांनी वाट्टेल त्या किमतीला मुद्रांक घेतले, त्याचा फटका सामान्य ग्राहकांनाही बसला. विक्रेत्यांनी कृत्रिम टंचाई निर्माण करीत सर्वसामान्यांनाही लुटले.

चौकट

डिसेंबरमध्ये प्रचंड लूट

एकट्या डिसेंबर महिन्यात जिल्हाभरात ५ हजारांहून अधिक खरेदी-विक्री झाली. त्यापोटी २२ कोटींचे मुद्रांक शुल्क पक्षकारांनी भरले. प्रत्येक मुद्रांकामागे २० रुपयांच्या अतिरिक्त वसुलीचा विचार करता यातून विक्रेत्यांनी किती पैसे मिळविले असावेत ही विचार करण्याजोगी स्थिती आहे.

------------