शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
6
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
7
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
8
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
9
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
10
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
11
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
12
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
13
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
14
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
15
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
16
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
17
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
18
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
19
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच

By admin | Updated: July 3, 2016 00:33 IST

अनेक भागात मुसळधार

सांगली : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने चांगलाच जोर धरला असून, शनिवारी दिवसभर जिल्ह्याच्या अनेक भागात मुसळधार पाऊस सुरूच होता. जिल्ह्याच्या पूर्वभागात अजूनही समाधानकारक पाऊस नसला तरी पश्चिम भागात विशेषत: शिराळा तालुक्यात जोरदार पाऊस सुरू असल्याने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे. शनिवारी दिवसभर जिल्ह्यातील शिराळा, वाळवा, पलूस, मिरज तालुक्यांत संततधार सुरू होती. जिल्ह्याच्या पश्चिम भागात असलेल्या धरण क्षेत्रात दमदार पाऊस सुरू असल्याने धरण साठ्यात वाढ होत असल्याचे पाटबंधारे विभागाने सांगितले. दरम्यान, जिल्ह्यात शुक्रवारी सायंकाळपासून शनिवारी सकाळपर्यंत ५.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे, तर सर्वाधिक २७.२ मिलिमीटर पावसाची नोंद शिराळा तालुक्यात झाली आहे. शनिवारी दिवसभर शहरासह जिल्ह्णात संततधार सुरूच होती. शिराळा, वाळवा, पलूस आणि मिरज तालुक्यात दमदार पावसाची नोंद झाली आहे. चांदोली धरण परिसरात शुक्रवारी १० मिलिमीटर पाऊस झाला. जिल्ह्णात बहुतांश तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली असतानाच, आटपाडी तालुक्यात मात्र पावसाने उघडीप दिल्याचे चित्र आहे. शनिवारी सकाळपर्यंत सरासरी ५.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, तालुकानिहाय आकडेवारी मिरज ५.७, जत २.३, वाळवा ९.६, शिराळा २७.२, पलूस ५.५, कवठेमहांकाळ ०.२, विटा ०.६, तासगाव ३.५ अशी पावसाची नोंद झाली आहे. (प्रतिनिधी)