शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

चरणमध्ये जिल्हा बॅँकेत चोरीचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2016 23:52 IST

घटनेबाबत गोपनीयता : कुलूप न तुटल्याने प्रयत्न फसला

चरण : चरण (ता. शिराळा) येथे जिल्हा मध्यवर्ती बॅँकेच्या शाखेत खिडकीचे गज कापून चोरट्यांनी लॉकर तोडण्याचा प्रयत्न केला. कुलूप न तुटल्याने मोठी रक्कम बचावली. ही घटना ३० मार्च रोजी मध्यरात्री घडली असून, याबाबत बँक प्रशासन व पोलिसांनी कमालीची गोपनीयता पाळली आहे. चरण येथे बसस्थानक चौकात जिल्हा बँकेची शाखा आहे. दररोज लाखो रुपयांची उलाढाल येथे होते. सोने तारण, ठेवी, कारखानदारांची बिले या माध्यमातून मोठे व्यवहार होत असतात. मार्चअखेरमुळे बँकेत मोठी आर्थिक उलाढाल सुरू होती. यादरम्यान बुधवार, दि. ३० रोजी मध्यरात्री चोरट्यांनी बँकेच्या इमारतीच्या दक्षिण बाजूला असलेल्या लहान खिडकीचा गज तोडून आत प्रवेश केला. सुमारे दोन टन वजनाचे पोलादी लॉकर तोडण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना यश आले नाही. चोरीची एकंदरीत पध्दत पाहता चोरटे एकाहून अधिक असावेत, अशी शक्यता आहे. याबाबत बॅँक प्रशासनाने पोलिसात तक्रार दिली असून, पोलिसांनी पंचनामा करून तपास सुरू केला आहे. चोरट्यांनी तोडलेल्या खिडकीची बॅँक प्रशासनाने तातडीने डागडुजी करून घेतली असून, या प्रकाराबाबत बॅँक प्रशासन व पोलिसांनी कमालीची गोपनीयता बाळगली आहे. (वार्ताहर)