लोकमत न्यूज नेटवर्क
कामेरी : कामेरी (ता. वाळवा) येथे कडक लॉकडाऊनमध्ये फक्त अत्यावश्यक वैद्यकीय सेवा व दूध संकलन व विक्री सुरू आहे. सध्या गावात १४५ कोरोनाबाधित आहेत. ६२ कोरोनामुक्त, तर ७९ रुग्णांवर होमआयसोलेशनने उपचार सुरू आहेत, तर चारजणांचा मृत्यू झाला आहे.
दूध संस्था सकाळी व सायंकाळी दोन तास सुरू ठेवणे, बाहेरगावचे व्यापारी व फिरते विक्रेते यांना गावात प्रवेश बंद करणे, किराणा दुकानांमध्ये दूध विक्री करता येणार नाही, गावामध्ये लग्नसमारंभ (२५ लोक), अंत्यविधी (२० लोक), रक्षाविसर्जन विधीसाठी नियमबाह्य गर्दी आढळल्यास संबंधितावर गुन्हे दाखल करणे, कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण अगर संपर्कातील व्यक्ती बाहेर फिरताना आढळल्यास दंडात्मक कारवाई व गुन्हा दाखल करणे, अशा उपाययोजना सुरू आहेत.